AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने कानशिलात लगावली तेव्हा…, नवरा – बायकोच्या सीन दरम्यान काय घडलेलं?

Nana Patekar : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना जेव्हा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री कानशिलात लागावलेली, तेव्हा सेटवर गंभीर वातावरण निर्माण झालेलं. फार कमी लोकांना माहिती आहे की, तेव्हा नवरा - बायकोच्या सीन दरम्यान काय घडलेलं?

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने कानशिलात लगावली तेव्हा..., नवरा - बायकोच्या सीन दरम्यान काय घडलेलं?
अभिनेते नाना पाटेकर
| Updated on: Jun 06, 2026 | 2:11 PM
Share

Nana Patekar : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण एका अभिनेत्रीने तर थेट नाना पाटेकरांच्या कानशिलात लगावली होती. ज्या अभिनेत्रीने नाना पाटेकरांच्या कानशिलात लगावली होती, त्या अभिनेत्रीचं नाव मधू शाह. मधू यांना देखील आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी स्क्रिन शेअर केली आहे. सध्या मधू त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्याद्दल मोठा किस्सा सांगितला आहे. मधू यांनी सांगितल्यानुसार, 1997 मध्ये त्यांनी नाना पाटेकर यांच्यासोबत ‘यशवंत’ सिनेमात काम केलं होतं. सिनेमातील एका सीन दरम्यान, नाना पाटेकर यांनी मधू यांच्या कनशिलात लगावली होती, त्यानंतर संतापलेल्या मधू यांनी देखील नाना पाटेकर यांच्या कानशिलात लगावली होती.

मुलाखतीत मधू यांनी जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या केल्या. मधू म्हणाल्या नाना पाटेकरांना सिनेमात कोणत्याच प्रकारचा देखावा आणि शॉर्टकट आवडत नाही, त्याच्या ते सक्त विरोधात आहेत. नाना पाटेकर कायम प्रामाणिक आणि वास्तविक अभिनयावर विश्वास ठेवतात. मधू म्हणाल्या, ‘यशवंत सिनेमात एक भावूक करणारा सीन होता. मी डोळ्या ग्लिसरीन टाकून रडण्याचा प्रयत्न करत होती. पण नानांनी मला पाहिलं आणि ओरडले, कोणीच ग्लिसरिनचा वापर करणार नाही. सीनचं महत्व अनुभवा… डोळ्यातून आपोआप निघेल… ‘ असं नाना पाटेकर म्हणालेले.

सीन दरम्यान मधू यांनी खरंच रडण्याचा प्रचंड प्रयत्न केला, पण डोळ्यातून एक पाण्याचा थेंब देखील निघत नव्हता. सीन वास्तववादी वाटावा म्हणून, नाना पाटेकर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता मधूच्या गालावर अचानक जोरात कानशिलात मारली.

पुढे मधू म्हणतात, “तालमीमध्ये असं काहीही ठरवलं नव्हतं. त्यांनी मला अचानक कानशिलात मारली आणि मला मोठा धक्का बसला. त्यावेळी मी खूप तापट स्वभावाची मुलगी होते. मला इतका राग आला की, माझ्या प्रतिक्रिया आपोआपच आल्या आणि दुसरा विचार न करता, मी लगेच नाना पाटेकर यांना जोरात कानशिलात लगावली.’

सीननंतर दिग्दर्शकाने तात्काळ केलं पॅकअप…

दिग्दर्शक अनिल मट्टू यांनी नवरा – बायकोच्या ह्या महत्त्वाच्या सीनच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण दिवस दिला होता. पण दोन्ही कलाकारांमध्ये झालेल्या प्रत्यक्ष थप्पडबाजीनंतर कॅमेऱ्यात कैद झालेल्या त्या अस्सल, खऱ्या भावनांनी सेटवरील प्रत्येकाच्या अंगावर काटा आणला. मास्टर शॉटमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरचा खरा राग आणि अश्रू स्पष्टपणे दिसत होते. सीन संपताच नाना पाटेकर दिग्दर्शकाला म्हणाले, ‘आता यानंतर तू कोणता क्लोज-अप शॉट घेणार आहेस? जे हवं होतं, ते तर झालं…’, त्यानंतर दुपारीच सिनेमातं पॅकअप करण्यात आलं.

Follow Us
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकारी
भाजपला सर्वात मोठा धक्का, अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर 15 पदाधिकाऱ्यांसह अनेकांचा पक्षाला रामराम...
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं
अजित पवारांच्या राष्ट्रावादीसाठी उमेदवार मागे घेतला? सुप्रिया सुळेंचं थेट उत्तर, म्हणाल्या आता...
आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Raj Thackeray | आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर.....
याची देही, याची डोळा... ऐसा देखिला अलौकिक सोहळा! रायगडावर शिवराज्याभिषेकासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी
भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादी
भुजबळ की आणखी कोणी..? राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्र होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष
आपलीच माणसं पैसे मागतायेत मग... विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट,
आपलीच माणसं पैसे मागतायेत मग... विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट, थेटच सांगितलं उमेदवाराच्या माघारीचं राजकारण
एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं
Sanjay Raut UNCUT | एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, आम्ही तर फाटकी लोकं, म्हणत संजय राऊतांचा पलटवार
जोपर्यंत बॅलेट पेपरवर... संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा,
जोपर्यंत बॅलेट पेपरवर... संजय राऊतांच्या त्या विधानाची सर्वत्र चर्चा, राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर!
Shivsena ubt | ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर! मालमत्तेच्या चौकशीने खळबळ
शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज! किल्ले रायगडावर ऐतिहासिक 353
Video | शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला दुर्गराज! किल्ले रायगडावर ऐतिहासिक 353 व्या राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह