विचित्र अपघात: ऊस घेऊन जाणारा ट्रक पलटी, उलट्या ट्रकवर कंटेनर धडकला, औरंगाबादजवळ भीषण घटना!

रस्त्यावर पलटी झालेल्या ट्रकला दुसरा कंटेनर येऊन धडकला. यात दोन जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. ट्रक मध्ये असलेला ऊस रस्त्यावर पसरला . त्यामुळे एका लेनची वाहूतुक बंद झाली .

विचित्र अपघात: ऊस घेऊन जाणारा ट्रक पलटी, उलट्या ट्रकवर कंटेनर धडकला, औरंगाबादजवळ भीषण घटना!
ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात

औरंगाबादः जिल्ह्यातील औरंगाबाद – पुणे महामार्गावर नवीन कायगाव बस स्टँडजवळ गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास भीषण (Accident) अपघात झाला. या ठिकाणी ऊस घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला आहे. त्यामुळे ट्रकमधील ऊस रस्त्यावर पडला. आणखी गंभीर म्हणजे या उलट्या झालेल्या ट्रकवर आणखी एक कंटेनर येऊन धडकला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

ऊस रस्त्यावर पसरला, कंटेनर येऊन धडकला

Sugarcane on road

अपघातामुळे रस्त्यावर पसरलेला ऊस

नवीन कायगाव बस स्टँडजवळ ट्रक पल्टी झाला. ट्रकमधील सगळा ऊस रस्त्यावर पसरला. त्यामुळे रस्त्याच्या एका लेनची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आणि वाहतूक कोंडी झाली. सकाळी शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही या अपघातामुळे अडचण झाली.

जेसीबीच्या सहाय्याने वाहने बाजूला केली

रस्त्यावर पलटी झालेल्या ट्रकला दुसरा कंटेनर येऊन धडकला. यात दोन जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. ट्रक मध्ये असलेला ऊस रस्त्यावर पसरला. त्यामुळे रस्त्यावरील एका लेनची वाहूतुक पूर्णपणे बंद झाली. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन दोनही ट्रक जसेबीच्या साहाय्याने बाजुला काढण्याचे काम सुरु आहे.

इतर बातम्या-

VIDEO: रावत यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डान घेतलं आणि थोड्याच वेळात संपर्क तुटला, राजनाथसिंगांनी लोकसभेत संपूर्ण घटनाक्रम जशास तसा सांगितला

VIDEO: माझ्या बोलण्याचा विपर्यास केला, महिलांचा अवमान करणे स्वभाव नाही, आता कोर्टातच बाजू मांडेन: आशिष शेलार


Published On - 12:27 pm, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI