AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वातावरणीय बदलाबाबतच्या कार्याबद्दल अंडर टू कोलेशनतर्फे महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लीडरशीप पुरस्कार

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या पुरस्कार सोहळ्यातील इन्स्पायरिंग रिजनल लीडरशीप, क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्यूशन्स आणि क्लायमेट पार्टनरशीप या तीनही पुरस्कारांसाठी नामांकन दाखल केले होते. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या रेस टू झिरो मोहिमेत महाराष्ट्राने सक्रिय सहभाग नोंदवत जागतिक स्तरावरही या मुद्द्यावर सक्रियता दाखवली आहे.

वातावरणीय बदलाबाबतच्या कार्याबद्दल अंडर टू कोलेशनतर्फे महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लीडरशीप पुरस्कार
वातावरणीय बदलाबाबतच्या कार्याबद्दल अंडर टू कोलेशनतर्फे महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लीडरशीप पुरस्कार
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 9:00 PM
Share

ग्लासगो (स्कॉटलंड) : अंडर टू कोलेशनमार्फत दिल्या जाणाऱ्या पहिल्यावहिल्या लीडरशीप पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची इन्स्पायरिंग रिजनल लीडरशीप पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वातावरणीय बदलाबाबत गांभीर्यपूर्वक कृती करत असलेली राज्ये आणि प्रदेश यांचा जागतिक समूह असलेल्या अंडर टू कोलेशनच्या पुरस्कारांचे ग्लासगोमध्ये होत असलेल्या कोप 26 परिषदेच्या पार्श्वभूमीवर घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राचे तरुण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात पर्यावरणीय व वातावरणीय विभागाने  केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल इन्स्पायरिंग रिजनल लीडरशीप पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

स्कॉटलंडमधील स्टर्लिंग कॅसल येथे पार पडलेल्या या सोहळ्यात राज्य पातळीवर वातावरण रक्षणासाठी तत्पर आणि चाकोरीबाहेर जाऊन प्रयत्न करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या पुरस्कार सोहळ्यातील इन्स्पायरिंग रिजनल लीडरशीप, क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्यूशन्स आणि क्लायमेट पार्टनरशीप या तीनही पुरस्कारांसाठी नामांकन दाखल केले होते. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या रेस टू झिरो मोहिमेत महाराष्ट्राने सक्रिय सहभाग नोंदवत जागतिक स्तरावरही या मुद्द्यावर सक्रियता दाखवली आहे. तसेच सी 40 शहरांच्या मोहिमेतही महाराष्ट्र सहभागी झाला आहे.

या पुरस्काराचा मान मिळवणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य

वातावरणीय बदलाला तोंड देण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी माझी वसुंधरा ही देशातील पहिली राज्यव्यापी मोहीम सुरू करून महाराष्ट्राने वातावरण बदलाबाबत गंभीर असल्याचे दाखवून दिले आहे. यू2 च्या या सोहळ्यात पुरस्काराचा मान मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. सोहळ्यात ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा) ला क्रिएटीव्ह क्लायमेट सोल्युशन्स पुरस्काराने गौरवण्यात आले तर, क्युबेक (कॅनडा) ला क्लायमेट पार्टनरशिप पुरस्कार देण्यात आला. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना हाताशी धरून राज्यातील संपूर्ण लोकसंख्येला व्यापणारे कार्यक्रम हाती घेतले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना वातावरण बदल ही जागतिक समस्या असून त्याला कोणतीही सीमा, जात, धर्म, पंथ, राष्ट्रीयत्व नसल्याचे म्हटले. या मुद्द्यावर सामूहिकरित्या प्रयत्न करण्याची आणि अर्थपूर्ण कृती करण्याची गरज असल्याचे महाराष्ट्राचे ठाम मत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांची अंडर टू कोलेशनने दखल घेतल्याचा मला आनंद आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अंडर टू कोलेशनमध्ये महाराष्ट्रासह भारतातील चार राज्ये सहभागी

भारतातील 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेले आणि देशातील सर्वात उद्यमशील राज्य असलेल्या महाराष्ट्राने वातावरण बदलाचा समर्थ मुकाबला करण्यासाठी धोरणे राबवण्याची गरज अतिशय कमी कालावधीत ओळखली. शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याकरिता आदर्श प्रकल्प, धोरणे आणि मोहिमा राबवत महाराष्ट्राने आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने महाराष्ट्रात वातावरण बदल कृतीबाबत जागृती निर्माण करण्यात यश कसे मिळवले, हेही राज्य सरकारच्यावतीने सादर नामांकन अर्जात नमूद करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात वातावरणाशी संबंधित विविध आपत्तींमध्ये महाराष्ट्राला तब्बल दोन अब्ज डॉलरहून अधिक नुकसान सोसावे लागल्याचेही त्यात म्हटले आहे. वातावरण बदलाबाबत महत्त्वाकांक्षी कृती करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या यू 2 ची जागतिक सदस्य संख्या आता 260 वर पोहोचली आहे. यात महाराष्ट्रासह भारतातील चार राज्ये सहभागी आहेत. मात्र, उर्वरीत दोन्ही पुरस्कारांची निवड करतानाही महाराष्ट्राचा आवर्जून गौरवास्पद उल्लेख करण्यात आला.

अंडर टू कोलेशन काय आहे?

जागतिक तापमान वाढीचे प्रमाण दोन अंश सेल्सियसच्या खाली ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेली महत्त्वाकांक्षी राज्ये आणि प्रादेशिक सरकारे यांचा अंडर टू कोलेशन हा समूह आहे. यामध्ये 260 हून अधिक सरकारे सहभागी असून त्याद्वारे जगातील पावणे दोन अब्ज लोकसंख्या आणि 50 टक्के अर्थव्यवस्था या मोहिमेशी जोडली गेली आहे. (Maharashtra’s Inspiring Regional Leadership Award from Under to Coalition for its work on climate change)

इतर बातम्या

Covid Vaccine: 2-18 वर्षे वयोगटातील मुलांना Covaxin च्या मंजुरीसाठी DCGI कडून वेळ लागण्याची शक्यता

MP Sex Racket: शिवसेना नेत्याच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 मुलींसह 3 ग्राहकांना अटक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.