Aaditya Thackeray : युतीची गोड बातमी पुढच्या 24 तासात, आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Aaditya Thackeray : "धर्मावरच भाजप म्हणून बोलायचं असेल तर पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला प्रवेश का दिला? खोट बोलायचं आणि रेटून बोलायचं. मुख्यमंत्री म्हणाले आम्ही नियो मेट्रो आणू, आयटी पार्क आणू, आले का ?"

Aaditya Thackeray : युतीची गोड बातमी पुढच्या 24 तासात, आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray
| Updated on: Dec 27, 2025 | 2:22 PM

“मुंबई महापालिकेत आम्ही करून दाखवलय. तुमची सत्ता राज्यात आणि केंद्रात पण आहे. तुम्ही स्वतः केलेलं एक काम दाखवा. फक्त फोडाफोडी राजकारण तुम्ही केलं. जेवढं इन्कमिंग भाजपत होईल, तेवढा इथल्या निष्ठावान कार्यकर्त्याना मान मिळेल. भाजपाला आणि संघाला प्रश्न आहे. सगळे भ्रष्टाचारी लोक तुमच्या पक्षात आहेत. ज्यांच्यावर खोटे आरोप होतें ते आमच्याकडे आहेत. दागी लोकांना घेतले ते तुमच्याशी बोलून घेतले का? हे विचारा” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “प्रभू श्रीरामांच्या पंचवटीत झाडं कापण्याच काम राक्षस करू शकतात. तुम्ही साधुग्रामच्या नावाखाली जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. ते आज नाशिक दौऱ्यावर आले होते. दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. विनायक पांडे यांनी 43 वर्षांच शिवबंधन तोडून भाजपत प्रवेश केला.

भाजपाचे चुनावी हिंदुत्व. भाजप रामराज्य नाही, तर रावण राज्य आणण्याच्या तयारीत आहे. भाजप म्हणजे बिल्डर जनता पार्टी. शहराचे विद्रुपीकरण, गुन्हेगारी याबाबत महिलांना काय वाटते. भाजप आमदार होता म्हणून बलात्कार करून सुद्धा एका आमदाराला बेल मिळाला” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “फाशीवर चढवायला हवे, त्यांना बेल मिळाली. बिलकिस बानोच्या परिवाराला डोळ्या समोर मारुन टाकले. लाडकी बहीण वर बोललो म्हणून मुख्यमंत्री चिडले होते. मात्र गुन्हेगारी,बेरोजगारी यावर बोलत नाहीत” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला प्रवेश का दिला?

“धर्मावरच भाजप म्हणून बोलायचं असेल तर पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला प्रवेश का दिला? खोट बोलायचं आणि रेटून बोलायचं. मुख्यमंत्री म्हणाले आम्ही नियो मेट्रो आणू, आयटी पार्क आणू, आले का ?” असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. “भाजपाने प्रायव्हेट बस आणले. मुंबईत जे करून दाखवले ते नाशिकमध्ये करायचं आहे. उद्धव साहेबांनी मुंबईत 4 मेडिकल कॉलेज आणले. नाशिक महापालिकेत किमान एक मेडिकल कॉलेज आणायचं आहे. नाशिकमध्ये प्रत्येक वार्डात सुसज्ज शाळा आणायच्या आहेत” असं आदित्य आपल्या व्हिजनबद्दल बोलताना म्हणाले.

आपलं चिन्ह परिवर्तनाच चिन्ह

“तपोवन वाचवायचे. महिलांसाठी विनामूल्य बसेस असतील. भाजपाने फ़क्त कर वाढवला. आपण परिवर्तन घडवणार. आपलं चिन्ह परिवर्तनाच चिन्ह. युतीची गोड बातमी पुढच्या 24 तासात मिळेल” असं आदित्य म्हणाले.