अल्टिमेटम देऊनही काहीच फरक पडला नाही, खासदार संभाजी छत्रपती संतप्त; 25 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभर दौरा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजी छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अल्टिमेटम देऊनही मराठा आरक्षणाबाबत या सरकारने काहीच केले नसल्याचं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. (sambhajiraje will start tour for maratha quota from 25th october)

अल्टिमेटम देऊनही काहीच फरक पडला नाही, खासदार संभाजी छत्रपती संतप्त; 25 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभर दौरा
sambhaji chhatrapati
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 12:43 PM

कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजी छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अल्टिमेटम देऊनही मराठा आरक्षणाबाबत या सरकारने काहीच केले नसल्याचं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. तसेच येत्या 25 ऑक्टोबरपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.

खासदार संभाजी छत्रपती यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. रायगडपासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. राज्य सरकारने आश्वासन देऊनही काहीच केलं नाही. सारथीचा एक मुद्दा सोडला तर इतर मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

आणखी काय चर्चा करणार?

राज्य सरकार राज्याची जबाबदारी पाळत नाही. सरकारला अल्टिमेटम दिला होता. पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही. आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची?, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. तसेच कुणी टीका करतयं त्याकडे मी लक्ष देत नाही. टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा, असं ते म्हणाले.

उदयनराजेंशी मतभेद नाही

मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या व्यक्तीच्या हातात असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी मतभेद असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. सातारा गादी आणि कोल्हापूरच्या गादीमध्ये कोणताही मतभेद नाही. उदयनराजे नेमकं काय म्हटले हे मला माहीत नाही, असंही ते म्हणाले.

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या:

मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह

मराठा तरुणांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहांच्या उभारणीची समाजाची मागणी आहे. त्याबाबत 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमध्ये सरकार वसतीगृह उभरणार आहे. सरकारची इमारत असलेल्या जिल्ह्यांची निवड त्यासाठी करण्यात आली आहे. त्यासाठी लागणाऱ्या पैशाची जबाबदारी सरकार घेणार आहे, अशी ग्वाही सरकारनं दिल्याचंही ते म्हणाले होते.

अण्णासाहेब पाटील महामंडळ

कर्जाची मर्यादा 10 लाखावरून 25 लाखापर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. त्यालाही सरकारनं मान्यता दिलीय. त्याचबरोबर मराठा समाजातील मुलांचे शिक्षण, शिक्षणासाठी परदेशात जाण्याबाबतही या महामंडळामार्फत मदतीचा पर्याय आहे.

प्रलंबित नियुक्त्या

एमपीएससीच्या नियुक्तांबाबत विशेष बाब म्हणून मुलांना नियुक्त्या द्या अशी मागणी आम्ही केलीय. सुपर न्युमररी अर्थात अधिसंख्येची जागा देण्याबाबतचा पर्यायही सरकारला सुचवला आहे. त्यावर सरकारने अटर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांना सांगितलं आहे. कायदेशीर बाबी तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या जागांमुळे सरकारवर आर्थिक भार वाढणार आहे. तो भार सोसू असा शब्द सरकारनं दिल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं होतं.

कोपर्डी बलात्कार प्रकरण

2017 ला फाशीची शिक्षा झालेल्या दोषीने 2019 ला अपील केलंय. सरकारने याबाबत अपील करण्याची, स्पेशल बेंच नेमण्याची मागणी केली. त्यावर सरकारने अपील केल्याचं सांगितलं. तसंच 1 जुलैपासून फिजिकल हिअरिंगला सुरुवात होणार. तेव्हा सरकारकडून स्पेशल बेंचची मागणी केली जाणार आहे.

गुन्हे मागे घेण्याचा मुद्दा

मराठा आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने आश्वासन दिलंय. 149 पैकी एकच गुन्हा मागे घेता येणार नाही. बाकी गुन्हे मागे घेण्याबाबत कोर्टात अपील करणार अशल्याचं सरकारनं सांगितलं. त्याचबरोबर एक समिती स्ठापन केली जाणार आहे. ही समिती मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांसोबत दैनंदिन बैठक होणार. त्या बैठकीत या सर्व गोष्टी युद्धपातळीवर कशा मार्गी लावल्या जातील त्याबाबत दैनंदिन चर्चा होईल.

संबंधित बातम्या:

राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणार, सारथी संदर्भात शनिवारी बैठक होणार

मूक आंदोलन सुरुच राहणार, आंदोलन मागे घेणार नाही, संभाजीराजे छत्रपती यांची माहिती

MPSC परीक्षार्थींना शनिवारी लोकल प्रवासाची परवानगी, शेलारांच्या पाठपुराव्याला यश

(sambhajiraje will start tour for maratha quota from 25th october)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.