…म्हणून पोलीस पुन्हा एकदा मैदानात उतरले, मुंबई पोलीस आयुक्तांचा विश्वास

गेल्या वर्षभरापासून पोलीस दल कोरोनाचा सामना करतंय, यावेळीही परिस्थिती बिकट आहे, पण त्याचा सामना करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत, असंही हेमंत नगराळे म्हणालेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:56 PM, 20 Apr 2021
...म्हणून पोलीस पुन्हा एकदा मैदानात उतरले, मुंबई पोलीस आयुक्तांचा विश्वास
mumbai police commissioner Hemant Nagarale

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale) यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे पोलिसांच्या कामगिरीची माहिती दिलीय. गेल्या वर्षभरापासून पोलीस दल कोरोनाचा सामना करतंय, यावेळीही परिस्थिती बिकट आहे, पण त्याचा सामना करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत, असंही हेमंत नगराळे म्हणालेत. (police came on the field once again, the Mumbai Police Commissioner Hemant Nagrale believes)

विनाकारण घराबाहेर पडू नका

वर्षभरात अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली, शिवाय काही पोलीस शहीद झाले. मात्र जनतेच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा पोलीस मैदानात उतरलेत. आम्ही वारंवार जनतेला आवाहन करतोय, विनाकारण घराबाहेर पडू नका, नियमांचे उल्लंघन करू नका. जनतेनेही सहकार्य करावे. पोलिसांचे मनोबल वाढवणं गरजेचं आहेच, त्यासाठी ग्राऊंडवर जाऊन स्वत: अधिकाऱ्यांशी चर्चा करतोय, संवाद साधतोय, असंही हेमंत नगराळेंनी सांगितलं.

म्हणून पोलिसांसाठी अडीचशे बेडचं कोव्हिड सेंटर आजपासून सुरू

पोलिसांसाठी या काळात सुविधा व्हावी, गैरसोय होऊ नये म्हणून अडीचशे बेड असलेलं कोव्हिडं सेंटर आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे. कलिना आणि कोळे कल्याणमध्ये राखीव कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आलीत, असंही हेमंत नगराळे म्हणालेत.

या काळात रेमडेसिव्हीर इंजेक्शन अत्यंत महत्त्वाचे

या काळात रेमडेसिव्हीर इंजेक्शन अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याची साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येतेय. मुंबई पोलिसांना तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्यात, त्यावर कारवाई केली जातेय. जनतेला आवाहन एवढंच आहे की, त्यांनी घरी राहावं, सुरक्षित राहावं. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावं. येत्या काळात कडक निर्बंध आले तरी कोणावरही लाठीचार्ज किंवा उठाबशा काढण्याचे प्रकार घडणार नाहीत. पोलीस नागरिकांशी सौजन्याने वागतील, असंही हेमंत नगराळे म्हणालेत.

संबंधित बातम्या

केडीएमसीत दोन आणखी स्मशानभूमी उभारुन 24 तास सुरु ठेवणार, महापालिका आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय

दररोज 1500 लोकं आपली माणसं गमावताहेत, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर उपाययोजनांची आवश्यकता, अमोल कोल्हे हळहळले

police came on the field once again, the Mumbai Police Commissioner Hemant Nagrale believes