Pune MahaMetro | गणेशमंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे महामेट्रोचे काम रखडले ; बंद कामामुळे दिवसाला बसतोय ५७ लाखांचा भुर्दंड
मेट्रोचे मार्गाता बदल करायचा असल्यास तब्बल ३९ खांब बदलावे लागणार आहेत. यासाठी प्रकल्पाच्या पूर्णत्त्वाचा कालावधी वाढणार आहे. मेट्रोच्या आराखड्यात बदल करावे लागणार आहेत. याबरोबरच खर्चात ७० कोटीची वाढ होईल असा सविस्तर अहवाल महामेट्रोने महापालिकेला सादर केला.

पुणे – शहरातील संभाजी पुलावरून जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गाची उंची वाढवाण्याची मागणी गणेश मंडळांकडून केली जात आहे. मात्र संभाजी पुलावरून मेट्रोच्या मार्गात, नियोजित आराखड्यात बदल करून उंची वाढवणे अयोग्य , अव्यवहार्य असतानाही केवळ सार्वजनिक गणेश मंडळानी घेतलेल्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे मेट्रोच्या कामाला खो बसला आहे. गणेश मंडळाच्या या वागण्यामुळे पुन्हा एकदा मेट्रोचे काम थांबले आहे.
गणेश मंडळाची मागणी काय? सार्वजनिक गणेश मंडळांच्या म्हणण्यानुसार गणेश विसर्जनावेळी मिरवणुकीच्या रथांना मेट्रोचे पूल आडवे येत आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या मेट्रो पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी गणेश मंडळानी केली आहे. मेट्रो मार्गिकेची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असे म्हटले आहे. गणेशमंडळांच्या या हट्टामुळे मागील तीन महिन्यामुळे मेट्रोचे काम रखडले आहे.
असा करावा लागेल बदल मेट्रोचे मार्गाता बदल करायचा असल्यास तब्बल ३९ खांब बदलावे लागणार आहेत. यासाठी प्रकल्पाच्या पूर्णत्त्वाचा कालावधी वाढणार आहे. मेट्रोच्या आराखड्यात बदल करावे लागणार आहेत. याबरोबरच खर्चात ७० कोटीची वाढ होईल असा सविस्तर अहवाल महामेट्रोने महापालिकेला सादर केला. या बदलानुसार नव्याने तांत्रिक मान्यता पुन्हा घ्यावा लागणार आहेत . यासगळ्या गोष्टी करणे शक्य नसल्याचे ही महामेट्रोने स्पष्ट केले आहे.
महापौरांच्या आदेशालाही खो मागील आठ्वड्यात महापौर मुरलीधर मोहळ यांनीही गणेश मंडळांना समजावून सांगत काम सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यापद्धतीने कामही सुरु झाले होते. मात्र गणेशममंडळांनी पुन्हा कामात खो घालत कामबंद पाडले. येत्या नवीन वर्षात मेट्रो प्रत्यक्ष प्रवासी सेवेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी मेट्रो आयोगाकडून मेट्रोची तांत्रिक तपासणीही करण्यात येणार आहे. मात्र हे काम रखडल्याने पुढील कामेही रखडली आहेत.
Nagpur| आई तू सोडून का गेलीस? युवकाचा तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न