आधी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना डिवचलं, अंगाशी आल्यावर यूटर्न…विखे पाटील म्हणतात, एखाद्या…
Radhakrishna Vikhe Patil: राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावरून विखे पाटवांवर सडकून टीका करण्यात आली होती. यानंतर आता विखे पाटलांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.

राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले होते. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचे,कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं विखे पाटील यांनी म्हटलं होते. यावरून विखे पाटवांवर सडकून टीका करण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यानंतर आता विखे पाटलांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. विखे पाटील नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
शेतकऱ्यांबाबतच्या विधानावर भाष्य
शेतकरी कर्जमाफीवर बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वादग्रस्त विधान केले होते. यावर स्पष्टीकरण देताना विखे पाटलांनी म्हटले की, ‘एखाद्या वक्तव्याचा किती विपर्यास व्हावा याच आश्चर्य वाटतं. ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या ज्या निवडणुका होतात, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कर्ज घेतो , मात्र त्यातून कोणती उत्पादकता होत नाही. कर्ज घ्यायच , पुन्हा कर्जबाजारी व्हायच आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं मी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोललो.
आज तीच अवस्था आहे, विरोधकांना फक्त कर्जबाजारी हा मुद्दा मिळाला. अनेक वर्ष मी सामाजिक जिवनात काम करतोय, मी बेताल वक्तव्य कधी करत नाही. माझा जो पहिला मुद्दा होता तो दाखवला नाही, कर्जबाजारी होतो आणि कर्जमाफी एवढाच मुद्दा पुढे आला. संपूर्ण वृंत्तात जर दाखवला असता तर हा मुद्दा आला नसता’ असं विखे पाटलांनी म्हटलं आहे.
पार्थ पवार जमीन प्रकरणावर भाष्य
पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, हे खरेदीच प्रकरण माझ्याकडेही आले होते. शेवटी ज्या महार वतनाच्या जमिनी सरकारी जमिनी आहेत त्याबाबत आपण निर्णय करूच शकत नाही. त्या त्या मंत्र्यांनी प्रस्ताव नाकारलेच होते. हा पूर्ण व्यवहारच नियमबाह्य आहे . ज्या वादाच्या जमिनी, वतनाच्या जमिनी याबाबत जिल्हापातळीवर काय झालं याची मला माहिती नाही. वर्ग 2 मधून वर्ग एक करून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून व्यवहार झाल्याचे काही प्रकरणं समोर आली आहेत. तो व्यवहार रद्द झाला, मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशीची घोषणा केली आहे, एकदा चौकशी होऊन जाऊ द्या.
