अभिनेता शेखर सुमन यांचा मोठा निर्णय, बॉलिवूडमधून थेट भाजपमध्ये; विनोद तावडे यांच्या उपस्थित प्रवेश

प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन आणि काँग्रेसच्या नेत्या राधिका खेडा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या दोघांनी प्रवेश केला आहे. शेखर सुमन यांची राजकारणातील ही दुसरी इनिंग आहे. या पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते राजकारणापासून दूर होते. आता नव्याने पुन्हा त्यांनी राजकारणात उडी घेतली आहे.

अभिनेता शेखर सुमन यांचा मोठा निर्णय, बॉलिवूडमधून थेट भाजपमध्ये; विनोद तावडे यांच्या उपस्थित प्रवेश
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 1:52 PM

लोकसभा निवडणुकीचं रणमैदान पेटलेलं असतानाच राजकीय घडामोडींनाही उधाण आलं आहे. आज तिसऱ्या टप्प्याच्या मतदानात देशभरातील जनता आणि नेते व्यस्त असतानाच दिल्लीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. प्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या उपस्थित शेखर सुमन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या राधिका खेडा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया समन्वयक राधिका खेडा यांनी छत्तीसगड काँग्रेसच्या सुशील आनंद शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. सुशील यांनी मला दारुची ऑफर केली होती, असा गंभीर आरोप राधिका यांनी लगावला होता. त्यांनी मध्यरात्री माझ्या रुमचा दरवाजा ठोठावला होता, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

अयोध्येला गेल्याने सवाल

राजीनामा दिल्यानंतर राधिका खेडा यांनी आपल्या मनातील वेदनाही बोलून दाखवल्या होत्या. काँग्रेस रामविरोधी, सनातन विरोधी आणि हिंदू विरोधी असल्याचं मी ऐकलं होतं. पण मी त्यावर विश्वास ठेवला नव्हता. महात्मा गांधी त्यांच्या मिटिंगची सुरुवातच रघुपती राघव राजाराम हे भजन म्हणून करायचे. पण मी माझ्या आज्जीसोबत अयोध्येला गेले. त्यानंतर घरी आल्यावर माझ्या घरावर मी जय श्रीरामचा झेंडा लावला. त्यानंतर काँग्रेसचे नेते माझा तिरस्कार करू लागले. तेव्हा मला काँग्रेसचं सत्य समजलं. मी हे झेंडा लावल्याचे फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे मला तसं केल्याबद्दल ओरडा खावा लागला होता. निवडणुकीच्या काळात अयोध्येला का गेली? असा सवालही मला करण्यात आला होता, असा आरोपही त्यांनी केला आहे.

शेखर सुमन यांची दुसरी इनिंग

दरम्यान, या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर राधिका खेडा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच अभिनेते शेखर सुमन यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विनोद तावडे यांनी त्यांचा सदस्यत्वाचा फॉर्म भरून त्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. शेखर सुमन यांची राजकारणातील दुसरी इनिंग आहे. या पूर्वी त्यांनी 2012मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता. 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिबमधून निवडणूक लढली होती. त्यांच्याविरोधात शत्रुघ्न सिन्हा उभे होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

कालपर्यंत वाटलं नव्हतं…

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शेखर सुमन यांनी मीडियाशी संवाद साधला. मी आज या ठिकाणी बसेल असं मला कालपर्यंत वाटलं नव्हतं. काही गोष्टी अचानक होऊन जातात. मी अत्यंत सकारात्मक विचार करून आलो आहे. मला इथपर्यंत येण्याचा आदेश दिल्याबद्दल मी सर्वात आधी देवाचे आभार मानतो, असं शेखर सुमन म्हणाले.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.