
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. 2009 मध्ये दोघं लग्नाच्या बंधनात अडकले होते आणि आता त्यांना दोन मुलंही आहेत. लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत, मात्र दोघांमधील प्रेम अजूनही पूर्वीसारखेच आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात झालं होतं. या रॉयल वेडिंगमध्ये केवळ कुटुंबातील सदस्य आणि दोघांचे खास मित्र सामील होते.

लग्नानंतर शिल्पा आणि राजनं इंडस्ट्रीतील लोकांसाठी रिसेप्शन आयोजित केलं होतं. ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स हजर होते.

शिल्पा शेट्टीनं तिच्या लग्नात लाल रंगाची साडी परिधान केली होती, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. चाहत्यांना शिल्पाचा लूक खूप आवडला होता.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. राज यांचं हे दुसरे लग्न होते.

शिल्पानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की राजनं तिला कॅरेट रिंगने प्रपोज केले होते.