
आपण अनेकदा बॉलिवूड चित्रपटांत इंटिमेट आणि रेप सीन पाहतो. हे सीन पडद्यावर साकारणे खूप कठीण असते. अनेकदा असे सीन शूट करण्यासाठी अनेक दिवस लागतात. तसेच कलाकारही त्यासाठी कधीकधी लवकर तयार होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा एका रेप सीनबद्दल सांगणार आहोत, जो शूट करत असताना व्हिलनचा स्वत: वरचा ताबा सुटला होता. तो पूर्णपणे विसरुन गेला होता की तो सीन शूट करत आहे. पण त्याचे हे वागणे अभिनेत्रीला चांगलेच खटकले होते. अशा वेळी अभिनेत्रीने अभिनेत्याच्या जोरदार कानशिलात लगावली. चला, जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं.

ज्या अभिनेत्रीबद्दल आम्ही बोलत आहोत त्या दुसऱ्या कोणी नसून जया प्रदा आहेत. आणि ज्या व्हिलनबद्दल आम्ही बोलत आहोत ते दिलीप ताहिल आहेत. जया आणि दिलीप यांनी १९८० मध्ये आलेल्या 'शान' चित्रपटात एकत्र काम केले होते.

'शान' या चित्रपटात त्यांच्यामधील एक रेप सीन चित्रीत करण्यात आला होता. हा सीन शूट करत असताना दिलीप यांचा स्वत:वरचा ताबा सुटला होता. त्यामुळे जया प्रदा यांनी त्यांच्या जोरदार कानशिलात लगावली होती.

या घटनेनंतर बरेच दिवस शूटिंग थांबले होते आणि निर्मात्यांनी खूप समजावल्यानंतर जया प्रदा शेवटी तयार झाल्या आणि चित्रपट पूर्ण झाला.

मात्र, गेल्या वर्षी दिलीप ताहिल यांनी सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत या साऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले. दिलीप म्हणाले, 'मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी जया प्रदा यांच्यासोबत कधीही काम केले नाही. मी त्यांच्यासोबत काम करू इच्छित होतो पण ते शक्य झालं नाही.'

दिलीप ताहिल यांनी चित्रपटांत काम करण्यापूर्वी बराच काळ नाटकांमध्ये काम केले होते. त्यानंतर १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अंकुर' चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते.