राऊतांची कोठडीची भाषा म्हणजे राहुल गांधींना जेलमध्ये पाठवण्याची धमकी? : किरीट सोमय्या

शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत सावरकरांना विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ask question to CM Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.

राऊतांची कोठडीची भाषा म्हणजे राहुल गांधींना जेलमध्ये पाठवण्याची धमकी? : किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Jan 18, 2020 | 2:52 PM

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरु असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ask question to CM Uddhav Thackeray) यांनी या वादात उडी घेतली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत सावरकरांना विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ask question to CM Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला. त्यानंतर संजय राऊत यांनी ‘सावरकरांना विरोध करणाऱ्यांना दोन दिवस जेलमध्ये ठेवावे’, असे वक्तव्य केले. त्यानंतर आता या वादत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे.

किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?

“संजय राऊतांचे आजचे विधान आहे की, सावरकरांना विरोध करणाऱ्या सर्वांना जेलमध्ये पाठवले पाहिजे. चार दिवसांपूर्वीच त्यांनी सांगितले की, इंदिरा गांधी यांचे अंडरवर्ल्डसोबत घनिष्ठ संबंध होते. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून संजय राऊत हे बोलत आहेत. याचा अर्थ उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देत आहेत का?  उद्धव ठाकरे राहुल गांधींना जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत”, असे किरीट सोमय्या म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“सावरकरांनी आयुष्याची 14 वर्षे अंदमानच्या तुरुंगात घातली. ही असामान्य गोष्ट या देशात घडली आहे. त्यांना त्यावेळी 50 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यावेळी त्यांनी 14 वर्षे तुरुंगवास भोगला. नंतर ते बाहेर आले. जे लोक त्यांना भारतरत्न देण्यासाठी विरोध करतात, ते कुणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही विचारसरणीचे असो या सर्वांना दोन दोन दिवस अंदमान तुरुंगात सावरकरांच्याच कोठडीत ठेवायला पाहिजे. मग त्यांना सावरकरांनी देशासाठी किती त्याग केला, संघर्ष केला आणि बलिदान दिलं हे कळेल”, असे संजय राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.