AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 Controversy : मोठी बातमी, पाकिस्तानचा नकवी ट्रॉफी रिर्टन करायला तयार, भारताच्या या अधिकाऱ्याने झापल्यानंतर आली अक्कल

Asia Cup 2025 Controversy : ACC आणि PCB चा प्रमुख मोहसीन नकवीची अक्कल ताळ्यावर आली आहे. तो भारताला ट्रॉफी परत करायला तयार झाला आहे. त्याने बीसीसीआयची माफी सुद्धा मागितली आहे. भारताच्या या अधिकाऱ्याने नकवीला झापल्यानंतर तो झुकण्यासाठी मजबूर झाला.

Asia Cup 2025 Controversy : मोठी बातमी, पाकिस्तानचा नकवी ट्रॉफी रिर्टन करायला तयार, भारताच्या या अधिकाऱ्याने झापल्यानंतर आली अक्कल
mohsin naqvi
| Updated on: Oct 01, 2025 | 3:24 PM
Share

ट्रॉफी वादादरम्यान मंगळवारी आशियाई क्रिकेट काऊन्सिलची बैठक झाली. या मीटिंगमध्ये बीसीसीआयने ACC प्रमुख मोहसीन नकवी यांची शाळा घेतली. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नकवींना खूप सुनावलं. माफी मागण्यासाठी आणि ट्रॉफी परत करण्यासाठी त्यांना भाग पाडलं. बैठकीच्या सुरुवातीला मोहसीन नकवी यांनी आक्रमकता दाखवली. तुमच्या खेळाडूंनी माझ्यासोबत वाईट वर्तन केलं, असं ते म्हणाले.

“मी कार्टुनसारखा ट्रॉफी घेऊन उभा होतो. तुमचे खेळाडू मोबाइलमध्ये व्यस्त होते. व्हिडिओ गेम खेळत होते. पण मी उभा असताना इतकही सौजन्य दाखवलं नाही की, ट्रॉफी घेण्यासाठी येतील. आता मी अशी ट्रॉफी देणार नाही. तुम्ही तुमच्या कॅप्टनला दुबईला पाठवा, तो माझ्याकडून ट्रॉफी घेऊन जाईल” असं नकवी म्हणाले.

क्रिकेट आणि राजकारणाची तुम्ही सरमिसळ केलीत

हे सर्व ऐकून घेतल्यानंतर राजीव शुक्ला यांनी लगेच पलटवार केला. “तुम्ही असा विचारच कसा केलात की आमचे खेळाडू तुमच्या हातून ट्रॉफी घेतील. तुम्ही एसीसी चेअरमन असण्यासोबतच पीसीबीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री सुद्धा आहात. फुटबॉलर विमान पडल्याची Action करतोय, असे नको ते टि्वट केले. क्रिकेट आणि राजकारणाची तुम्ही सरमिसळ केलीत” असं राजीव शुक्ला यांनी सुनावलं.

‘आमचा कॅप्टन मुंबईत आहे,तो दुबईला का येईल?’

“तुम्ही भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड किंवा बोर्डाच्या कुठल्या अधिकाऱ्याबरोबर बोलायला पाहिजे होतं. तुम्ही म्हणता मी ट्रॉफी देऊ का नाही? तुम्ही ट्रॉफी द्यायला आलात, तर बोलायला पाहिजे होतं. तुमच्याहातून खेळाडू ट्रॉफी घेणार नाहीत, हे सांगितलं असतं. तुम्ही त्या ठिकाणी बराचवेळ उभं राहून वाद आणखी का वाढवला? हे तुम्हाला शोभा देत नाही. आमचा कॅप्टन मुंबईत आहे,तो दुबईला का येईल?. तुम्ही ट्रॉफी एसीसी किंवा आयसीसीला पाठवा. आम्ही तिथून मागवू” असं उत्तर राजीव शुक्लांनी दिलं.

‘मी ट्रॉफी आयसीसीला पाठवतोय’

इतकं सगळं ऐकून घेतल्यानंतर नकवी बोलले की, “राजीव तुम्ही बरोबर बोलताय. जे झालं, ते नाही व्हायला पाहिजे होतं. मी त्यासाठी माफी मागतो. मी ट्रॉफी आयसीसीला पाठवतोय. तुम्ही तिथून मागवा” त्यावर राजीव शुक्लांनी नकवीचे आभार मानले.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.