
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधन गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. स्मृती संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलशी लग्न करणार होती. पण काही कारणास्तव तिने हे लग्न मोडले आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर स्मृतीच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम लागला. दरम्यान, सोशल मीडियावर स्मृतीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत दिसत आहे. हार्दिक ज्या प्रकारे स्मृतीकडे पाहातो त्याची आता पुन्हा चर्चा रंगली आहे.
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी स्मृती मानधना आणि हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्मृतीने निळ्या रंगाचा वनपिस परिधान केला आहे. त्यावर त्याने सुंदर असे कानातले घातले आहे. या लूकमध्ये स्मृती अतिशय सुंदर दिसत आहे. तर हार्दिकने निळ्या रंगाचे ब्लेझर, पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि बूट घातले आहेत. दोघेही एका कार्यक्रमात मंचावर बसलेले दिसत आहेत.
वाचा: आमच्या इमोशन्सशी खेळू नका; ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर श्रद्धा कपूरने केली फिल्म इंडस्ट्रीची पोलखोल
What would be @mandhana_smriti‘s top three songs if she were to create a playlist inside the dressing room? 🤔@hardikpandya7 helps us find out! 😃👌#NamanAwards pic.twitter.com/WiYGTJuxzP
— BCCI (@BCCI) February 1, 2025
दरम्यान, हार्दिक पांड्या स्मृतीला प्रश्न विचारतो की, ड्रेसिंग रुममध्ये ती कोणती तीन गाणी प्ले करते? प्रश्न ऐकताच स्मृती पहिले लाजते, नंतर हसते आणि म्हणते, मला असे वाटते की प्ले लिस्ट बनवणारी मी शेवटची व्यक्ती असेल. कारण माझी सर्व गाणी ही लव्ह साँग्स असतात किंवा सॅड साँग असतात. मी सामन्यापूर्वी देखील पंजाबी गाण्यांऐवजी अशी गाणी ऐकत असते. त्यामुळे मी स्पिकरच्या शेजारी जाऊन कधीही गाणे बदलण्याचा प्रयत्न करत नाही. सामन्याआधी मी हेडफोनवर गाणी ऐकते. पण हा, मला संगीत खूप आवडते आणि मला अरिजीत सिंगचे कोणतेही गाणे आवडते.
नेटकरी फिदा
स्मृती मानधना बोलत असताना हार्दिक तिच्याकडे ज्या प्रकारे पाहात असतो ते पाहून आता चांगलीच फिरकी घेत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून हार्दिक पांड्या आणि स्मृती मानधनाची जोडी योग्य आहे असे म्हटले आहे. तर काहींनी हार्दिक स्मृतीकडे ज्या प्रकारे पाहातो ते पाहून तो प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे. हार्दिक आणि स्मृतीचा हा जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ खरं तर फेब्रुवारी महिन्यात बीसीसीआयने आयोजित केलेल्या नमन अवॉर्ड्समधील आहे. या पुरस्कार सोहळ्यात स्मृतीला महिला गटातील २०२३-२४ चा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता.