Dangerous Snakes : जगातील ते 5 सर्वात खतरनाक साप; दंश करताच काही वेळात जातो जीव, तुम्हाला माहिती आहे का?

Snake Venom : साप दिसला की भांबेरी उडल्याशिवाय राहत नाही. सापाच्या दंशामुळे जीव जाण्याचे प्रमाणही कमी नाही. साप बिनविषारी असेल तर धोका नाही. पण साप जर विषारी असेल तर मात्र तातडीनं उपाय योजना कराव्या लागतात. जगातील या 5 सापाच्या जाती सर्वात घातक मानल्या जातात.

Dangerous Snakes : जगातील ते 5 सर्वात खतरनाक साप; दंश करताच काही वेळात जातो जीव, तुम्हाला माहिती आहे का?
धोकादायक साप
| Updated on: Oct 03, 2025 | 1:52 PM

जगभरात सापाच्या एकाहून एक विषारी प्रजाती आहेत. जर विषारी साप कुणाला चावला तर ती व्यक्ती वाचणे अशक्य आहे. जगातील या पाच सापाच्या जाती तर सर्वात विषारी मानल्या जातात. साप चावल्यानंतर सापाचे विष मानवी शरीरावर मोठा परिणाम करते. मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम होतो. मनुष्याला लवकर वाचवले नाही तर प्राण जाऊ शकतो. अथवा तो वाचला तरी त्याचे शरीरावर दुरगामी परिणाम होतात. मनुष्याला अर्धांगवायूचा झटका बसू शकतो. अथवा इतरही गंभीर इजा होऊ शकते.

सापाच्या दंशामुळे 12 लाख मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) आकडेवारी हैराण करणारी आहे. त्यानुसार, अंदाजे 5.4 दशलक्ष लोकांना प्रत्येक वर्षी साप दंश करतो. तर त्यातील काही साप हे बिनविषारी असतात. या प्रकरणात जवळपास 81410 ते 1,37,880 लोकांचा दरवर्षी मृत्यू ओढावतो. तर गंभीर इजा अथवा अर्धांगवायूचा झटका येणाऱ्यांची संख्या तर यापेक्षा अधिक आहे.

या आकडेवारीनुसार, भारतात 2000 ते 2019 या कालावधीत भारतात 12 लाख लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे वर्षाला सरासरी 58 हजार जणांचा मृत्यू सापाच्या दंशामुळे झाला. तर अनेक जणांना अर्धांगवायूचा झटका बसला. मानवी शरीरात विष भिनल्यानंतर शारीरीक उपाय होतो. अशा व्यक्तीला श्वास लागण्याचा, थकव्याचा, कमी दिसण्यासारखे आजारही उद्भवू शकतात.

पाच खतरनाक साप

जगभरात सापाच्या जवळपास 3900 प्रजाती आहेत. त्यात केवळ 725 साप हे विषारी आहेत. तर 250 प्रजाती अत्यंत विषारी आणि घातक मानल्या जातात.

सॉ-स्कॅल्ड वायपर – हा विषारी साप मध्य आशियात आढळतो. हा साप अत्यंत आक्रमक असतो. तो दाटलोकवसतीत आढळतो. भारतात या सापामुळे दरवर्षी जवळपास 5 हजार लोकांचा मृत्यू ओढावतो.

इनलँड टायपन – हा अत्यंत विषारी साप मानल्या जातो. या सापाच्या एका दंशाने 100 व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो, असे म्हणतात. त्यावरून तो किती घातक असतो हे समोर येते. हा साप मानवी वसाहतीपासून दूर अडोशाला असतो.

ब्लॅक माम्बा – जंगलाचा राजा सिंह सुद्धा या सापापासून चार हात लांब थांबतो. हा साप आफ्रिकेत आढळतो. जर वेळेत उपचार मिळाले नाही तर अर्ध्या तासाच्या आतच व्यक्तीचा मृत्यू ओढावतो.

रसल वायपर – भारतीय कोब्रा, कॉमन करॅत,सोयास्कल वायपर आणि रसल वायपर हे भारतातील बिग फोर मानल्या जातात. भारतीय उपखंडात या चार सापांच्या दंशाने मृत्यूचा आकडा सर्वात मोठा होतो. रसल वायपर चावल्यानंतर अत्यंत वेदना होतात. भारतातील साप दंशाच्या ज्या घटना आहेत. त्यातील 43 टक्के या सापाच्याच आहेत.

कॉमन करॅत – बिग फोरमधील अजून हा एक धोकादायक सदस्य आहे. हा साप चावला आणि लवकर इलाज झाला नाही तर मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असते. याच्या विषात न्यूरोटॉक्सीन असते. त्याचा मज्जासंस्थेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे अर्धांगवायूचा झटका आणि मृत्यू ओढावतो.

साप चावल्यास कसे ओळखाल?

साप चावल्यावर त्या ठिकाणी, त्या अंगावर दोन छिद्रासारखी चिन्ह दिसतात. याशिवाय अत्यंत वेदना होतात. तो भाग सुजतो. लाल होतो आणि तिथे आग होते. जर साप जास्त विषारी असेल तर मग ही लक्षण अधिक दिसू शकतात. जसे की

अस्पष्ट दिसणे

अशक्तपणा जाणवणे

घशाला कोरड, गिळण्यास त्रास

तोंडाला वेगळाच स्वाद येणे

उलटी होणे वा चक्कर येणे