Anjali Damania Video : ‘….म्हणूनच मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच हवा’, कराडच्या ‘त्या’ व्हायरल क्लिपवरून दमानियांचा संताप
वाल्मिक कराड आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव निशिगंधा खुळे असं आहे. तर सायबर सेलच्या पीएसआय निशिगंधा खुळे यांच्यासोबत वाल्मिक कारडचा झालेल्या संवाद सध्या व्हायरल होतोय
सायबर सेलच्या पीएसआय निशिगंधा खुळे यांच्यासोबत वाल्मिक कारडचा झालेल्या संवाद सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये ‘किरकोळ गुन्हा आहे. आपला पोरगा आहे. जाऊद्या द्या सोडून’, असं ऐकायला मिळत आहे. तर मी बीड जिल्ह्याचा बाप आहे. मी असल्यावर चिंता काय असाही संवाद या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. दरम्यान टीव्ही ९ मराठी या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. दरम्यान, या व्हायरल ऑडिओ क्लिपवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचा बॉस हा धनंजय मुंडे आहे. या टोळीची कराडची दहशत बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे हे सगळं तोडून पाडण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा’, असं पुन्हा एकदा अंजली दमानिया म्हणाल्या. तर अंजली दमानिया यांनी अजित पवारांची आज भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी काही कागदपत्र दिलेत. मात्र यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उत्तर देतील. अंजली दमानिया यांनी जे काही पुरावे दिले. त्याविषयी अधिक न बोलता त्यांनी आपल्या राजीनाम्याविषयीचा निर्णय हा सर्वस्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

