फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात SIT स्थापन करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात SIT स्थापन करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

| Updated on: Nov 01, 2025 | 11:08 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस महासंचालकांना दिलेल्या या निर्देशानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे आभार मानले. संपदा मुंडे (निर्भया डॉक्टर) यांना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या प्रकरणात एका महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलीस महासंचालकांना दिले

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वागत केले असून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. जनभावना आणि पीडित संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे प्रकरण विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फलटण प्रकरणातील निर्भया डॉक्टरला लवकरात लवकर न्याय मिळेल, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. हा निर्णय केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नसून, राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या सुरक्षा आणि सन्मानाचा प्रश्न आहे, असे त्या म्हणाल्या.

Published on: Nov 01, 2025 11:08 AM