Sanjay Raut | लोक माझ्याकडून घोडे लावण्याचे धडे घेतात – संजय राऊत

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या कुरबुरी सुरू असून त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या कुरबुरी सुरू असून त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. युती आणि आघाडीत भांड्याला भांडं लागतच असतं. जर भांड्याला भांडं लागायला नको असं वाटत असेल तर 150 जागा निवडून आणा, असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील एका सभेत हे आवाहन केलं. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी स्थानिक पातळीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर राऊत यांनी भाष्य केलं. इतरांसारखं शिवसेना कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. विजय शिवतारे आम्ही तुमच्या मागे आहोत. युती होईल, महाविकास आघाडी होईल. सन्मानाने जागा वाटप झालं तर आपण एकत्र लढू, असं सांगतानाच युती, महाविकास आघाडीमध्ये भांड्याला भांड लागणार. हे नको असेल तर 150 जागा निवडून आणा. जो पर्यंत ते होत नाही तोपर्यंत गोड मानून घ्या, असं राऊत म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI