अरे देवा! नदी कोरडी पडल्याने सांगलीतील द्राक्षबागा संकटात

अरे देवा! नदी कोरडी पडल्याने सांगलीतील द्राक्षबागा संकटात
अशक्तपणा, कॅसरवर प्रभावी द्राक्षे, जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे

निमणी बंधाऱ्याच्या परिसरातच द्राक्षबागा व ऊस शेतीचे प्रमाण लक्षणीय आहे. | Sangli Grapes Farming

Rohit Dhamnaskar

|

Apr 05, 2021 | 10:44 AM

सांगली: सांगलीच्या तासगाव पश्चिम भागास वरदान ठरत असलेली आणि बारमाही झालेली येरळा नदी सध्या ऐन उन्हाळ्यात कोरडी पडल्याने या परिसरातील द्राक्ष बागायतदारांवर (Grapes Farming) संकट ओढावण्याची शक्यता आहे. येरळा नदीचे पाणी आटल्याने राजापूर, तुरची, ढवळी व निमणी परिसरातील संपूर्ण येरळाकाठची ऊसशेती व द्राक्ष बागा पाण्याविना धोक्यात आल्या आहेत. (Grapes Farming in Sangli district Maharashtra)

बागायत शेती वाचविण्यासाठी कण्हेर धरणातील आरफळ योजनेचे किंवा ताकारी योजनेचे पाणी हे निमणी येथील बंधारा पूर्णपणे भरेपर्यंत येरळा नदीत सोडण्याची मागणी येरळाकाठावरील शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. या नदीवर निमणी व वसगडे येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. निमणी बंधाऱ्यात तेरा फूट उंचीचा जलसाठा करण्याची सोय असून या बंधाऱ्याची साठवण क्षमता 27 दशलक्ष घनफूट आहे. या जलसाठ्यावर मंजूर क्षेत्र 215 हेक्टर आहे.

गेल्यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने व एकदा आरफळ योजनेचे पाणी सोडल्याने निमणी व वसगडे येथील दोन्ही बंधारे वेळेत भरल्याने येरळा नदीकाठचा रब्बी हंगाम यशस्वी होऊ शकला. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून येरळा कोरडी पडली असल्याने व निमणी येथील बंधारा कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, येरळाकाठ परिसरातील सर्व विहिरी व कूपनलिकेतील पाणी पातळी खाली गेल्याने संपूर्ण बागायत शेती धोक्यात आली आहे.

द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात, पाण्याची गरज

निमणी बंधाऱ्याच्या परिसरातच द्राक्षबागा व ऊस शेतीचे प्रमाण लक्षणीय आहे. सध्या या परिसरातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या बागांची खरड छाटण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. या काळात द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. अशा वेळेस द्राक्ष बागांना पाणी न मिळाल्यास पुढील द्राक्ष हंगाम धोक्यात येणार आहे.

सोलापुरात द्राक्ष बागायतदारांना सुगीचे दिवस

सोलापूर जिल्ह्यातून यंदा पाच हजार मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात करण्यात आली. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातून 97 हजार 46 मेट्रिक टन द्राक्षे युरोपीयन देशात निर्यात झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही निर्यात पाच हजार मेट्रिक टनाने अधिक आहे.

संबंधित बातम्या: 

Cucumber Farming । एक लाख रुपयात सुरु करा काकडीची शेती, सरकारी मदतीने होईल 8 लाख रुपयांची कमाई

टरबूज, खरबुजाची शेती, 70 दिवसात 8 लाख कमवले; वाचा जिगरबाज शेतकरी दाम्पत्याची कहाणी

‘शुगर फ्री पेरु’ची शेती ठरतेय वरदान, मराठवाड्यात दुष्काळी भागात शेतकऱ्याला लाखोंचा फायदा

(Grapes Farming in Sangli district Maharashtra)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें