मुंबईत 10-12 घर येतील इतकी किंमत, या भारतीयकडे आहे जगातील सर्वात महागडा टीपॉट
जगातील सर्वात मौल्यवान आणि महागडा टीपॉटचा किताब 'द इगोईस्ट'कडे आहे. 2016 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांची नोंद झाली. जो ब्रिटिश-भारतीय अब्जाधीश निर्मल सेठिया यांच्याकडे आहे, ही चहाची भांडी 18 कॅरेट सोने, चांदी आणि हिऱ्यांनी सजवली आहे. त्याची किंमत इतकी आहेत की तुम्ही मुंबईत कमीत कमी १० फ्लॅट खरेदी करु शकता.
चहाची किटली सुद्धा करोडोंची असू शकते का? असा तुम्ही कधी विचार पण केला नसेल. पण आता तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल. जगातील सर्वात महाग टीपॉटची किंमत इतकी आहे की तुम्ही मुंबईत १०-१२ फ्लॅट खरेदी करु शकता. या टीपॉटला ‘द इगोईस्ट’ म्हणून ओळखले जाते. 2016 मध्ये, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्याला जगातील सर्वात महाग टीपॉट घोषित केलंय. तसे तर चहाची भांडी चैनीचे आणि कलेचे प्रतीक असतात. पण हा चहाचा टीपॉट खास आहे. त्यामध्ये इतकं खास काय आहे हे आपण जाणून घेऊयात.
ब्रिटीश-भारतीय अब्जाधीश निर्मल सेठिया यांच्या एन सेठिया फाउंडेशनने हा ‘द इगोईस्ट’ नावाचा टीपॉट बनवला आहे. या टीपॉटची रचना प्रसिद्ध कारागीर फुल्वियो स्कॅव्हिया यांनी केली आहे. हा टीपॉट बनवण्यासाठी 18 कॅरेट सोने, चांदी, 1,658 हिरे आणि 386 इतर रत्ने आणि धातूंचा वापर करण्यात आला आहे.
6.67 कॅरेट थाई रुबी
टीपॉटची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती म्हणजे त्याची थाई रुबी. ही 6.67 कॅरेटची थाई रुबी पॉटच्या मध्यभागी सेट केली आहे. त्याचे हँडल खास हस्तिदंतापासून बनवलेले आहे. 2016 मध्ये या टीपॉटची किंमत 24.8 कोटी रुपये इतकी होती. आता हा टीपॉट संपत्ती आणि भव्यतेचे प्रतीक आहे. कोलकाताहून लंडनमध्ये स्थायिक झालेल्या निर्मल सेठिया हे भारतीय परंपरेशी खूप खोलवर जुळलेले आहेत.
ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक
भारत, ब्रिटन, आफ्रिका आणि रशिया यांसारख्या अनेक देशांमध्ये ते सेवाभावी योगदान करतात. शिक्षण, धर्म आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात त्यांचं योगदान मोठं आहे. त्यासाठी ते ओळखले जातात. सुमारे £6.5 अब्ज संपत्तीसह, ते ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.
या टीपॉटवर विलक्षण डिझाईन केले आहे. यावर अफाट असे हिरे वापरले आहेत. ‘द इगोइस्ट’ केवळ लक्झरीचंच प्रतिनिधित्व करत नाही तर निर्मल सेठियाची अनोखी दृष्टीही प्रतिबिंबित करते. ते व्यावसायिक आहेत. त्यांचं यश आणि सामाजिक सेवेबद्दलची त्यांची वचनबद्धता देखील त्यांचं कतृत्व दर्शवते.