ICSI CS Exam June 2021 : आयसीएसआयकडून सीएस फाउंडेशन आणि एक्झिक्युटिव्ह परीक्षा स्थगित

कंपनी सेक्रेटरी फाउंडेशन आणि सीएस कार्यकारी(जुने आणि नवीन पाठ्यक्रम)साठी 1 जून 2021 से 10 जून 2021 पर्यंत परीक्षा (ICSI CS Exam June 2021) आयोजित करण्यात आली होती. (CS Foundation and Executive exams postponed by ICSI)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:25 AM, 5 May 2021
ICSI CS Exam June 2021 : आयसीएसआयकडून सीएस फाउंडेशन आणि एक्झिक्युटिव्ह परीक्षा स्थगित
आयसीएसआयनकडून सीएस फाउंडेशन आणि एक्झिक्युटिव्ह परीक्षा स्थगित

ICSI CS Exam June 2021 नवी दिल्ली : देशात सध्या सुरु असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे आयसीएसआयने कंपनी सेक्रेटरी परीक्षा स्थगित केली आहे. इंस्टीट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने आपली अधिकृत वेबसाईट icsi.edu वर एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (CS Executive Exam) आणि प्रोफेशनल प्रोग्राम (CS Professional)ची परीक्षा (ICSI CS Exam June 2021) स्थागित केल्याचे घोषित केले आहे. कोरोना महामारीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (CS Foundation and Executive exams postponed by ICSI)

जूनमध्ये आयोजित करण्यात आली होती परीक्षा

कंपनी सेक्रेटरी फाउंडेशन आणि सीएस कार्यकारी(जुने आणि नवीन पाठ्यक्रम)साठी 1 जून 2021 से 10 जून 2021 पर्यंत परीक्षा (ICSI CS Exam June 2021) आयोजित करण्यात आली होती. आयसीएसआयने सूचित केले आहे की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे निर्माण झालेली परिस्थितीची समिक्षा केल्यानंतर परीक्षेची पुढील तारीख घोषित केली जाईल.

याआधीही कोरोनामुळे अर्ज भरण्यासाठी दिली होती मुदतवाढ

इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) ने या वर्षी जून महिन्यात होणाऱ्या सीएस फाउंडेशन(CS Foundation), कार्यकारी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवली होती. याबाबत इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने अधिसूचना जारी करुन माहिती सामायिक केली होती. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता कोरोनामुळे परीक्षाच स्थगित करण्यात आली आहे.

नवीन तारखेची घोषणा केली जाईल

संस्थेने सूचित केले आहे की, परीक्षा सुरु होण्याआधी कमीत कमी 30 दिवस आधी उमेदवारांना नवीन परीक्षेच्या अनुसूचीबाबत(ICSI CS जून 2021 परीक्षा अनुसूची) सूचित केले जाईल. यासाठी नवीन अपडेट पाहण्यासाठी नियमित अधिकृत वेबसाईट icsi.edu तपासा, असे आयसीएसआयने आवाहन केले आहे. इंस्टीट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) भारतात कंपनी सेक्रेटरी पद विकसित करणारी भारतातील एकमेव मान्यता प्राप्त संस्था आहे. (CS Foundation and Executive exams postponed by ICSI)

इतर बातम्या

PHOTO | जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या कचाट्यात, ‘इतके’ खेळाडू बाधित

चीनचं रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, ‘या’ देशांवर कधीही कोसळण्याची शक्यता, पृथ्वी संकटात ?