AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government Jobs : कुठं कुठं जायाचं नोकरीला ? ओ सरकारी नोकरी आहे, जिथं जमंल तिथं गप जायाचं…!

ऑफलाइन पद्धतीनं पत्राद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क 50 रुपये आहे. 18,000 रुपये ते 56,900 रुपये असं वेतनमान असणारे. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रं जोडावीत.

Government Jobs : कुठं कुठं जायाचं नोकरीला ? ओ सरकारी नोकरी आहे, जिथं जमंल तिथं गप जायाचं...!
सीमा रस्ते संघटना Image Credit source: BRO Official Website
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 20, 2022 | 2:37 PM
Share

सीमा रस्ते संघटना (Border Roads Organisation)अंतर्गत तब्बल 302 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहे. मल्टी स्किल्ड वर्कर (Mason) आणि मल्टी स्किल्ड वर्कर ( Nursing Assitant) या पदांसाठीच्या या जागा आहेत. ऑफलाइन पद्धतीनं पत्राद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क 50 रुपये आहे. 18,000 रुपये ते 56,900 रुपये असं वेतनमान असणारे. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रं जोडावीत. पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट देण्यात आलेली आहे. उपलब्ध जागांमध्ये मल्टी स्किल्ड वर्करच्या (मेसन) 147 जागा आणि मल्टी स्किल्ड वर्करच्या ( नर्सिंग असिस्टंट) 155 जागा विभागून आहेत. या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी सीमा रस्ते संघटनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि लवकरात लवकर अर्ज भरावा.

पदांचे नाव आणि उपलब्ध जागा

  • मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 147
  • मल्टी स्किल्ड वर्कर ( नर्सिंग असिस्टंट) – 155

पदांनुसार शैक्षणिक पात्रता

  • मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 1) 10वी परीक्षा उत्तीर्ण 2) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून (आयटीआय) इमारत बांधकाम/ ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र/ औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र/ नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रमाणपत्र
  • मल्टी स्किल्ड वर्कर ( नर्सिंग असिस्टंट) – 1) 10वी परीक्षा उत्तीर्ण २) ANM किंवा उच्च शिक्षण किंवा समतुल्य

वयाची अट

23 मे 2022 रोजी [ SC/ST- 05वर्षे सूट, OBC – 03वर्षे सूट ]

  • मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 18 ते 25 वर्षे
  • मल्टी स्किल्ड वर्कर ( नर्सिंग असिस्टंट) – 18 ते 27 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता

Commandant,GREF CENTRE, Dighi Camp, Pune- 411015

महत्त्वाचे

  • शुल्क भरण्यासाठी लिंक – Click Here
  • जाहिरात – Click Here
  • अधिकृत वेबसाईट – Click Here
  • वेतनमान – 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये
  • अर्ज शुल्क – 50 /- रुपये [ SC/ST – शुल्क नाही ]

इतर माहिती

  • नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 23 मे 2022
  • आवश्यक कागदपत्रे जोडावीत
  • माहिती अपूर्ण, अर्ज अपात्र

( टीप – अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी )

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?