AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : नगरसेविकेला बाहुली म्हणणे आले अंगलट; बीएमसीच्या अधिकाऱ्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास

40 वर्षीय नगरसेविकेला मोबाईलवर (Mobile) लज्जा निर्माण होईल असे संदेश पाठवल्याबद्दल एका बीएमसीच्या (BMC) अधिकाऱ्याला दोषी ठरवून न्यायालयाने (Court) त्याला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

Mumbai : नगरसेविकेला बाहुली म्हणणे आले अंगलट; बीएमसीच्या अधिकाऱ्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास
वाशीतील बस स्टॉपवर महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंगImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 1:54 PM

मुंबई : 40 वर्षीय नगरसेविकेला मोबाईलवर (Mobile) लज्जा निर्माण होईल असे संदेश पाठवल्याबद्दल एका बीएमसीच्या (BMC) अधिकाऱ्याला दोषी ठरवून न्यायालयाने (Court) त्याला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच पीडितेला तीन हजार रुपये देण्याचे आदेश देखील न्यायालयाच्या वतीने देण्यात आले आहेत. हे प्रकरण 2016 मधील आहे. पीडिता व तिच्या पतीने केलेल्या दाव्यानुसार 26 जानेवारी 2016 च्या रात्री साडेअकरा वाजता संबंधित महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एका अनोळखी नंबरवरून अनेक संदेश आले. ज्यामध्ये तू जेवली का? झोपलीस का? तुझे लग्न झाले आहे का असे विविध प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच आरोपीकडून काही अश्लील छायाचित्रेही पाठवण्यात आले होते. त्यानंतर या महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. पतीने त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र कॉलला प्रतिसाद मिळाला नाही. परत एक संदेश संबंधित महिलेच्या व्हॉट्सअॅपवर आला त्यामध्ये मला माफ करा रात्र असल्याने कॉल उचलू शकत नाही. ऑनलाईन या मला चॅट आवडते असा मजकूर होता. यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

न्यायालयाने काय म्हटले?

या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला तीन महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे. तसेच तीन हजार रुपये देण्याचे आदेश देखील दिले आहे. शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हटले आहे की, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. महिला घराबाहेर तसेच घरात देखील असुरक्षीत आहेत. अशा प्रकरणात आरोपीला शिक्षा झाल्यास तो इतर लोकांसाठी एक मोठा धडा असेल. अशा आरोपींना शिक्षेची आवश्यकता असल्याचंही न्यायालयाने म्हटले आहे. संबंधित व्यक्ती हा पीडितेला ओळखत नसताना देखील अशी छायाचित्रे पाठवणं किंवा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणं चुकीचं असल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण 2016 मधील आहे. पीडिता आणि तिच्या पतीने केलेल्या दाव्यानुसार 26 जानेवारी 2016 च्या रात्री साडेअकरा वाजता संबंधित महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एका अनोळखी नंबरवरून एकापाठोपाठ अनेक संदेश आले. ज्यामध्ये तू जेवली का? झोपलीस का? जेवण झालं का? तू खूप सुंदर दिसतेस बाहुलीसारखी असे एकापाठोपाठ अनेक संदेश पाठवण्यात आले होते. या प्रकरणात संबंधित नगरसेविकेने आणि तिच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणात आरोपीला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्ष सुनावण्यात आली आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.