आधी मारहाणीमुळं एकाचा मृत्यू, दुसऱ्याची आत्महत्या, आता पुन्हा नागपूर पोलिसांवर गंभीर आरोप

नागपूर पोलिसांवर एका केटरिंग व्यवसायिकाला मारहाण करून त्याच्याकडून पैसे हिसकावण्याचा आरोप झालाय. कृष्णकांत दुबे असं या केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

  • Updated On - 3:49 pm, Fri, 13 August 21 Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम Follow us -
आधी मारहाणीमुळं एकाचा मृत्यू, दुसऱ्याची आत्महत्या, आता पुन्हा नागपूर पोलिसांवर गंभीर आरोप


नागपूर : पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर या दिव्यांग ऑटोमोबाईल मेकॅनिकचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अन्य एका घटनेत पुन्हा पोलिसांच्या मारहाणीनंतर अकाउंटंट महेश राऊत यांनी आत्महत्या केली. ही प्रकरणं ताजी असतानाच नागपूर पोलिसांवर एका केटरिंग व्यवसायिकाला मारहाण करून त्याच्याकडून पैसे हिसकावण्याचा आरोप झालाय. कृष्णकांत दुबे असं या केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

10 ऑगस्ट रोजी ते नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीवरून नागपूरला परतत असताना शुभांगीनगर जवळ त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. त्यामुळे मध्यरात्रीनंतर ते हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी खेचून जात होते. यावेळी रात्रपाळीवर असलेल्या दोन पोलीस शिपायांनी दुबे यांना थांबविले आणि एवढ्या रात्री फिरण्याबद्दल विचारणा केली. त्यानंतर दोन्ही पोलीस शिपायांनी दुबे यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन मारहाण केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी कृष्णकांत दुबे यांनी आज (13 ऑगस्ट) वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे या घटनेची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

मनोज ठवकर मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपुरात पोलिसांच्या मारहाणीत मनोज ठवकर या तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय. मृतक मनोज ठवकर यांची गाडी पोलीस वाहनावर धडकल्याने पोलीसांनी त्यांना जबर मारहाण केली होती. नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील या घटनेनंतर या प्रकरणातील 3 पोलिसांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणेंची बदली करण्यात आलीय. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, म्हणून हे प्रकरण सीआयडीकडे सोपवलं आहे. यात विभागीय चौकशीही सुरू आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.

हेही वाचा :

दोन दिवसांपूर्वीचं भाडणं काढलं, दोघांवर सशस्त्र हल्ला, 5 आरोपींना बेड्या, नागपुरात गुन्हेगारी वाढली ?

Ganga Jamuna Red Light Area | नागपुरातील 200 वर्षांपासूनची वेश्यावस्ती बंद, महिला रस्त्यावर उतरणार

गुन्हे कमी करण्यासाठी नागपूरमध्ये ‘क्यूआर कोड’, पोलिसांना घटनास्थळी जाऊन करावं लागणार पंचिंग

व्हिडीओ पाहा :

Serious allegation on Nagpur police about money snatching and beating

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI