AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Leone : स्वत:च्या घरातच चाकू घेऊन का फिरायची सनी लिओन ?

सनी लिओनीच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा तिला तिच्याच घरात चाकू घेऊन फिरावे लागले. याचा खुलासा खुद्द तिनेच केला आहे. सनी लिओनी ही एकदा अरबाज खानच्या शोमध्ये पोहोचली होती, तेव्हा तिने तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याशी निगडीत अनेक किस्से सांगितले.

Sunny Leone : स्वत:च्या घरातच चाकू घेऊन का फिरायची सनी लिओन ?
सनी लिओनImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 21, 2025 | 12:58 PM
Share

बॉलिवूडमधील कलाकार सनी लिओनला ओळखत नाही अशी व्यक्ती विरळच असेल. अडल्ट इंडस्ट्रीमधून मेन स्ट्रीममध्ये येण्याचा तिचा प्रवास फार काही सोपा नव्हता. पण अथक मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये एक स्थान मिळवलं आहे. मात्र याच सनी लिओनच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा तिला तिच्याच घरात चाकू घेऊन फिरावे लागले. याचा खुलासा खुद्द तिनेच केला आहे. सनी लिओन ही एकदा अरबाज खानच्या शोमध्ये गेली होती, तेव्हा तिने तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याशी निगडीत अनेक किस्से सांगितले.

त्यावेळी तिने एक किस्सा सांगितला जो ऐकून सगळेच हादरले. सनीने सांगितलं की एकदा ती इतकी घाबरली की तिने थेट चाकूच उचलला आणि दरवेळेस ती स्वत:च्या घरातच चाकू घेऊन फिरायची.

या शोमध्ये अरबाज खानने सनी लिओनीला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तर देताना अभिनेत्रीने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गुपिते उघड केली होती. तिने कधीही कोणत्याही ट्रोलविरोधात तक्रार केली आहे का? असा सवाल तिला विचारण्यात आला. तेव्हा तिने होकारार्थी उत्तर देत सगळा किस्सा सांगितला.

स्वत:च्या घरातच चाकू फिरायची वेळ का आली ?

“ एक व्यक्ती होती, ज्याला आम्ही ओळखायचो, पण आता तो गायब झाला आहे आणि मी त्याला ब्लॉक केले आहे. मी त्याच्याविरुद्ध मुंबईच्या सायबर क्राईम युनिटमध्ये तक्रार दाखल केली होती. त्या व्यक्तीने मला मानसिकदृष्ट्या खूप त्रास दिला होता”, असं सनी लिओनीने सांगितलं. “तोच नव्हे तर त्याचे फॉलोअर्सही माझ्या टाइमलाइनवर अतिशय घाणेरड्या कमेंट्स करायचे. तो इतका हिंसक होता की त्याने माझ्या कुटुंबाला धमकावले. त्याच्याशी संबंधित काही लोक थेट माझ्या माझ्या घरीच आले आणि हा माझ्यासाठी खूप भीतीदायक अनुभव होता”, असेही तिने नमूद केलं. “मी तेव्हा थेट चाकू उचलला आणि घराच्या दाराजवळ आले, कारण तेव्हा माझा पतीही घरी नव्हता. त्यावेळी अशी परिस्थिती होती की मी दिवसभरात बराच वेळ चाकू घेऊनच फिरायचे”, असा भीतीदायक अनुभव सनी लिओनीने सांगितलe.

बायोपिकमध्ये उघड केली अनेक रहस्य

मात्र, सनी लिओनच्या आयुष्याबद्दल चाहत्यांना जे सांगितलं ती काही पहिलीच वेळ नव्हती. याआधी तिने  ‘करणजीत: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’ या बायोपिकमध्ये तिच्या आयुष्याशी संबंधित बरीच रहस्यं उघड केली आहेत. या माध्यमातून अशी अनेक रहस्ये उघडकीस आली जी लोकांना माहिती नव्हती. सनी लिओनी पंजाबी शीख कुटुंबातील आहे. जेव्हा ती फक्त 11 वर्षांची होती, तेव्हा तिचे संपूर्ण कुटुंब यूएसमध्ये स्थलांतरित झाले आणि ती तिथेच मोठी झाली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.