Life Story : वयाच्या ११ व्या वर्षापासून अभिनेत्री सोसतेय दु:ख; आईप्रमाणे तिलाही नाही मिळाली पतीची साथ

Life Story : वयाच्या 25 व्या वर्षी श्रीमंत कुटुंबातील मुलासोबत अभिनेत्री अडकली विवाहबंधानात, मुलगा झाल्यानंतर पतीने सोडली साथ, आईसोबत जे तेच अभिनेत्रीने देखील सोसलं..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा... कोण आहे 'ती'?

Life Story : वयाच्या ११ व्या वर्षापासून अभिनेत्री सोसतेय दु:ख; आईप्रमाणे तिलाही नाही मिळाली पतीची साथ
| Updated on: Oct 23, 2023 | 11:08 AM

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर झगमगत्या विश्वात पुढे आल्या आहेत. अनेक संकटांवर मात करत त्यांनी स्वतःचं ध्येय गाठलं… करियरमध्ये यशाच्या उच्च शिखरावर असल्यामुळे अनेक अभिनेत्री तरुणींच्या प्रेरणा स्थानी आहे. पण अभिनेत्रींना कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे ट्रोल केलं जातं. बॉलिवूडमध्ये देखील एक अशी अभिनेत्री आहे, वयाच्या ५० व्या वर्षी देखील प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसते. आजही अनेकांच्या मनावर अभिनेत्री राज्य करते. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्रीला सर्वकाही मागे राहिल्यासारखं वाटत होतं. सध्या ज्या अभिनेत्रीबद्दल चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मलायका अरोरा आहे.

मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. एकदा एका शोमध्ये अभिनेत्रीने तिच्या वडिलांबद्दल मोठा खुलासा केला. मलायाका ११ वर्षांची असताना वडिलांनी कुटुंबाची साथ सोडली.

मलायका म्हणाली, ‘मी ११ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी आईची साथ सोडली. आईने एकटीने माझा आणि बहीण अमृता अरोरा हिचा सांभाळ केला. आयुष्यातील ते दिवस फार कठीण होते…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र मलायका हिची चर्चा सुरु आहे. कारण आज अभिनेत्रीचा वाढदिवस आहे.

मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट

वयाच्या २५ व्या वर्षी मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या १९ वर्षांनंतर मलायका आणि अरबाज यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे सर्वत्र धक्का बसला. मलायका आणि अरबाज विभक्त झाले असले तरी मुलासाठी कायम एकत्र येतात. महत्त्वाचं म्हणजे आईप्रमाणे मलायका हिला देखील पतीची साथ मिळाली नाही.

मलायका आणि अर्जुन कपूर

अरबाज याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. एवढंच नाही तर, दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली देखील दिली आहे. दोघांमध्ये वयाचं अंतर फार असल्यामुळे दोघांना अनेकदा ट्रोल करण्यात आलं. दोघांच्या नात्याची चर्चा देखील सोशल मीडियावर कायम रंगलेली असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us