Sairat: ‘सैराट’मधील अभिनेत्याची पुण्यात रिक्षावाल्याकडून लूट; फेसबुकवर पोस्ट लिहित सांगितली घटना

या प्रवासादरम्यान त्याला आलेला वाईट अनुभव त्याने फेसबुकवरील पोस्टद्वारे सांगितला आहे. 'हे कुठे तरी थांबलं पाहिजे. अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढतील,' असंही त्याने पोस्टच्या अखेरीस म्हटलंय.

Sairat: 'सैराट'मधील अभिनेत्याची पुण्यात रिक्षावाल्याकडून लूट; फेसबुकवर पोस्ट लिहित सांगितली घटना
'सैराट'मधील अभिनेत्याची पुण्यात रिक्षावाल्याकडून लूटImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 10:07 AM

रिक्षाचालकांबाबतच्या (autorickshaw driver) अनेक तक्रारी आपण ऐकतो. कधी जवळचं भाडं नाकारलं जातं, तर कधी दुसऱ्या मार्गावरून फिरवून अधिक भाडं मागितलं जातं. असाच मनस्ताप ‘सैराट’मधल्या (Sairat) अभिनेत्याला सहन करावा लागला. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटात परश्याचा खास मित्र सल्याची भूमिका साकारणाऱ्या अरबाज शेखने (Arbaj Shaikh) याबाबत फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. अरबाज हा पुण्यात राहतो आणि नांदेड सिटी ते पुणे स्टेशनपर्यंत त्याने ऑटोने प्रवास केला. मात्र या प्रवासादरम्यान त्याला आलेला वाईट अनुभव त्याने फेसबुकवरील पोस्टद्वारे सांगितला आहे. ‘हे कुठे तरी थांबलं पाहिजे. अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढतील,’ असंही त्याने पोस्टच्या अखेरीस म्हटलंय.

नेमकं काय घडलं?

‘पुण्यात रिक्षावाल्यांकडून लूट. सगळेच रिक्षावाले असे असतील असे नाही. नाव- असिफ मुल्ला, रिक्षा नंबर- MH 12 NW 9628. नांदेड सिटी ते पुणे स्टेशन 198 रुपये होतात. मी कधीच ओला, उबर, रॅपिडो असले ॲप वापरत नाही. पाऊस चालू होता. मित्राला म्हणालो पाऊस चालू आहे, कुठे सोडायला येतो आणि परत पावसात ये ये आणि जा जा.. माझ्या मित्राने मला रिक्षा करून दिली रॅपिडो ॲपवरून. पाऊस चालू होता. नांदेड सिटीमधून रिक्षा निघाली. त्याने मला खूप फिरवलं. मी त्याला सांगितलं दादा तू खूप फिरवतो, त्यावर त्याने काही उत्तर दिलं नाही. 60 रुपये एक्स्ट्रा मागायला सुरुवात केली. मी म्हणलो का? मी त्याला विचारलं असता त्याने मला शिवी दिली. “पाऊस चालू आहे, तू इथेच उतर, जास्त बोलू नको, मी रोज रिक्षा चालवतो तू नही, 60 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागेल नाही तर इथेच उतर.” मी उतरू शकत नव्हतो आणि मला ट्रेन होती 6 ची. गावी जायचं होत . मी त्याला ओळख सांगितली नाही. माझ्या सारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर हे असे फेस करावे लागत असेल तर गावावरून/ फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील. त्यांची हे लोक किती लूट करत असतील. हे कुठे तरी थांबलं पाहिजे. अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढतील,’ अशी पोस्ट त्याने लिहिली.

हे सुद्धा वाचा

अरबाजच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनीही संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध संताप व्यक्त केला. ‘इमर्जन्सी कंडीशनचा फायदा घेतात हे लोक, यांना चाप लावलाच पाहिजे,’ असं एकाने म्हटलंय. तर ‘अतिशय निंदनीय’ अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. ‘सामान्य माणूस यांच्या नादी लागत बसत नाही. याच गोष्टींचा हे भुरटे फायदा घेतात. याच्यावर आरटीओ आणि पुणे महानगरपालिका हद्द सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली पाहिजे. जर असा काही प्रकार रिक्षावाल्याने केला तर त्याच लायसन्स रद्द करण्यात यावं,’ अशीही मागणी नेटकऱ्यांनी केली.

‘सैराट’ या चित्रपटामुळे अरबाजला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. परश्याच्या दोन मित्रांपैकी एक साकारणारा सल्या हा या चित्रपटामुळे रातोरात प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याने नागराज मंजुळे यांच्याच ‘झुंड’मध्येही भूमिका साकारली.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.