5

आलिया भट्टसोबत लेबर रूममध्ये कसा होता रणबीर कपूर याचा अनुभव? अभिनेत्याकडून मोठा खुलासा

लेकीच्या जन्मानंतर एक आठवडा पत्नीसोबत रुग्णालयात होता रणबीर कपूर.. आलियासोबत लेबर रूममध्ये आलेल्या अनुभवाबद्दल अभिनेत्याने केला मोठा खुलासा... रणबीर याच्या आयुष्यातील 'ते' क्षण म्हणजे...

आलिया भट्टसोबत लेबर रूममध्ये कसा होता रणबीर कपूर याचा अनुभव? अभिनेत्याकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 1:08 PM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर सध्या अभिनेत्री आणि पत्नी आलिया भट्ट हिच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. रणबीर कपूर (ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट कपूर (alia bhat) कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडचं सर्वात क्यूट कपल म्हणून आलिया आणि रणबीर यांची ओळख आहे. सध्या आलिया आणि रणबीर मुलगी राहा हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगताना दिसत आहेत. मुलीच्या जन्मानंतर आलिया आणि रणबीर यांना कायम त्यांच्या चिमुकलीबद्दल विचारलं जातं. कपल देखील राहा हिच्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मी सतत राहाला मिस करत असतो असं देखील रणबीर एका कार्यक्रमा म्हणाला होता.

रणबीर कपूर याने अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या What Women Want या चॅट शोमध्ये खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. करीनाने रणबीरला आलियासोबत लेबर रूममध्ये आलेल्या अनुभवाबद्दल विचारलं. अनुभवाबद्दल सांगताना अभिनेता म्हणाला, ‘खूप चांगला होता…’ पुढे अभिनेता म्हणाला, राहाचा जन्म झाल्यानंतर जवळपास एक आठवडा रुग्णालयात होतो. जेव्हा आलियाने राहाला जवळ घेतलं… त्या क्षणांचा उल्लेख अभिनेत्याने अविस्मरणीय म्हणून केला.

हे सुद्धा वाचा

पुढे करीनाने रणबीरला वडील म्हणून स्वतःला किती गुण देशील असा प्रश्न विचारला. यावर रणबीरने स्वतःला ७ गुण दिले. कारण रात्रीची झोप खराब होते. कारण जेव्हा तुमचं पहिलं बाळ असचं तेव्हा उत्साह असतो.  बाळ आपल्यामध्ये झोपलेलं असतं आणि थोडी जरी हालचाल केली तरी ते लगेच उठतं… असं देखील रणबीर म्हणाला. एवढंच नाही तर मी राहाला नेहमी मिस करत असतो असं देखील अभिनेता म्हणला.

गेल्या वर्षी झालं आलिया – रणबीर यांचं लग्न रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी २०२२ मध्ये लग्न केलं. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीर यांच्या मुलीचं नाव राहा कपूर असं आहे. पण अद्याप दोघांनी लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. दोघांनी राहासाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आलिया – रणबीर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता एनिमल सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. तर दुसरीकडे आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. अनेक चाहते आई झाल्यानंतर आलिया मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Non Stop LIVE Update
अजित दादांच्या नाराजीमुळे मिळालं पालकमंत्रीपद? विरोधकांचा हल्लाबोल
अजित दादांच्या नाराजीमुळे मिळालं पालकमंत्रीपद? विरोधकांचा हल्लाबोल
त्या प्रकरणी मनसे आक्रमक, फेरीवाल्यासह राजू पाटलांनी गाठलं पोलीस ठाणं
त्या प्रकरणी मनसे आक्रमक, फेरीवाल्यासह राजू पाटलांनी गाठलं पोलीस ठाणं
मोदी सरकारचा गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय, घरगुती गॅसचे दर पुन्हा कमी
मोदी सरकारचा गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय, घरगुती गॅसचे दर पुन्हा कमी
'डीजे, डॉल्बीचा नातवाला त्रास म्हणून..', अंधारेंनी राज ठाकरेंना डिवचलं
'डीजे, डॉल्बीचा नातवाला त्रास म्हणून..', अंधारेंनी राज ठाकरेंना डिवचलं
उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हातून नवजात बाळ पडलं अन्...
उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हातून नवजात बाळ पडलं अन्...
Ranbir Kapoor च्या अडचणी वाढणार? ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?
Ranbir Kapoor च्या अडचणी वाढणार? ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?
कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?
कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...