तारक मेहता का उल्टा चश्माच्या एका एपिसोडसाठी राज अनादकट घेत होता तगडी फी

दया बेन म्हणजे दिशा हिने मालिका सोडल्याने सुरूवातीला प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता.

तारक मेहता का उल्टा चश्माच्या एका एपिसोडसाठी राज अनादकट घेत होता तगडी फी
| Updated on: Dec 08, 2022 | 10:59 PM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ही मालिका लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. आजही तारक मेहता या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. दया बेन म्हणजे दिशा हिने मालिका सोडल्याने सुरूवातीला प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. परंतू आजही मालिका टीआरपीमध्ये धमाल करत आहे. दया बेनसोबतच अनेक कलाकार मालिका सोडून गेले तर अनेक कलाकारांनी तारक मेहता का उल्टा चश्माच्या माध्यमातून नवा प्रवास सुरू केला.

नुकताच शोमधील कलाकार आणि सर्वांचा आवडता टप्पू अर्थात राज अनादकट याने ही मालिकेला कायमचा रामराम केलाय. राज याने मालिका सोडण्याचे थेट कारणही प्रेक्षकांना सांगून टाकले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होत्या की, राज अनादकट याने मालिका सोडली आहे. परंतू या अफवा असल्याचे सांगण्यात आले. राज याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मालिका सोडल्याचे जाहिर केले.

राज अनादकट याला खरी ओळख ही तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमधून मिळालीये. मात्र, अचानक राज अनादकट याने मालिका सोडल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.

राज याने काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंहसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यामुळे चाहते असा अंदाजा बांधत आहे की, राज बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

तुम्हाला हे माहिती आहे का? राज अनादकट हा तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या एका एपिसोड तगडी फी घेत होता. एका एपिसोडसाठी राज तब्बल 10 ते 20 हजार फी घेत असे…