इराणकडून इस्त्रायलवर भीषण हल्ले सुरु असताना हा देश संकटमोचक म्हणून आला धावून
Iran Israel War: इराणने शंभर पेक्षा जास्त बॅलेस्टीक क्षेपणास्त्र इस्त्रायलवर ढागली. इस्त्रायलचे आयरन डोम्स आणि डेव्हिड स्लिंग इराणी क्षेपणास्त्राचा मारा सहन करण्यात अयशस्वी ठरणार होते. त्यावेळी इस्त्रायलचा मित्र देश संकटमोचक बनून मदतीसाठी धावून आला.

इराण-इस्त्रायल संघर्ष पेटला आहे. इस्त्रायलने सुरु केलेल्या ऑपरेशन रायजिंग लायनला इराणने 13 जून रोजी ऑपेशन ट्रू प्रॉमिस-3 ने उत्तर दिले आहे. इराणकडून शंभर पेक्षा जास्त बॅलेस्टीक क्षेपणास्त्र इस्लायलवर डागण्यात आले. तेल अवीवमधील अवकाशात सातत्याने स्फोट होताना दिसत होते. लोक आपले प्राण वाचवण्यासाठी बंकरमध्ये जाऊन लपत होते. इराणने इस्त्रायलमध्ये विध्वंश करण्याचा निश्चय केला होता. परंतु त्या काळ्या रात्री एक देश इस्त्रायलसाठी संकटमोचक बनला.
कोण ठरला संकटमोचक
इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणमधील शंभरपेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात इराणचे आर्मी चीफ, कमांडर, अणू शास्त्रज्ञ यांचाही समावेश होता. तसेच नतांजसह अनेक अण्वस्त्र प्रकल्पही उद्ध्वस्त केले. त्यामुळे इराणने ऑपेशन ट्रू प्रॉमिस-3 ला सुरुवात केली. त्या माध्यमातून इस्त्रायलमध्ये विध्वंश माजवण्याची पूर्ण तयारी करण्यात आली होती. इराणने शंभर पेक्षा जास्त बॅलेस्टीक क्षेपणास्त्र इस्त्रायलवर ढागली. इस्त्रायलचे आयरन डोम्स आणि डेव्हिड स्लिंग इराणी क्षेपणास्त्राचा मारा सहन करण्यात अयशस्वी ठरणार होते. त्यावेळी इस्त्रायलचा मित्र देश संकटमोचक बनून मदतीसाठी धावून आला.
⚠️RAW FOOTAGE: Iran launched multiple ballistic missiles toward Israel in the past hours.
The IDF cannot, and will not, allow Iran to attack our civilians. pic.twitter.com/IrDK05uErm
— Israel Defense Forces (@IDF) June 13, 2025
इस्त्रायलसाठी संकटमोचक बनलेला हा देश अमेरिका होता. इराणी क्षेपणास्त्रांचा हल्ला रोखण्यासाठी अमेरिकेने इस्त्रायलला साथ दिली. अमेरिकेची मदत मिळाली नसती तर इस्त्रायलची परिस्थिती भीषण झाली असती. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सैन्याने इराणकडून ढागण्यात आलेले क्षेपणास्त्र नष्ट करण्यासाठी इस्त्रायलची मदत केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेने इराणचा क्षेपणास्त्र हल्ला रोखण्यात आणि अमेरिकन ठिकाणांची सुरक्षा करण्यासाठी उपाययोजना केली. परंतु ही मदत कशी केली, त्याची माहिती दिली नाही.
इस्त्रायलने शुक्रवारी पहाटे इरामधील अण्वस्त्र केंद्र आणि लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने भीषण हल्ले केले होते. इराणधील अण्वस्त्र केंद्र नष्ट करणे हा उद्देश इस्त्रायलचा होता. इराणने अणूबॉम्ब बनवला तर तो इस्त्रायलच्या अस्तित्वासाठीच धोक्याचे ठरणार होते. त्यामुळे इस्त्रायलने हल्ला केला. तसेच अमेरिकेनेसुद्धा न्यूक्लीयर डील करण्यासाठी इराणला ६० दिवसांची मुदत दिली होती. ती मुदतही पूर्ण झाली होती.