Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला

पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला
Follow us
| Updated on: Jul 19, 2020 | 11:02 AM

नवी दिल्ली : अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा मुहूर्त अखेर ठरला. पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (PM Narendra Modi to lay foundation stone of Ayodhya Ram Mandir Temple)

पंतप्रधान कार्यालयाकडून 5 ऑगस्ट या तारखेवर सहमती झाल्याची माहिती आहे. मात्र हे भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार की पंतप्रधान प्रत्यक्ष अयोध्येत जाऊन करणार, यावर अद्याप अंतिम निर्णय बाकी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 जुलै रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन करणार होते. दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी भूमीपूजन करणार होते. मात्र भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टने भूमीपूजन आणि निर्माण कार्याला जून महिन्यात तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनिश्चित काळासाठी भूमीपूजन लांबणीवर पडले होते. मात्र अखेर श्रावणात राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे.

अयोध्येतली माती 2 जून रोजीच दिल्लीला आणण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ही माती स्वाधीन केली होती.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट

फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिराबाबत निवेदन दिलं. मोदी कॅबिनेटने राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली. मंदिर उभारण्यासाठी जो ट्रस्ट स्थापन करण्यात आला, त्याला ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ असं नाव देण्यात आलं आहे. त्याबाबत निवेदन देताना मोदी म्हणाले, “श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्येत भव्य-दिव्य श्रीराम मंदिर निर्माण आणि संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल”

हेही वाचा : राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा, उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींचं अभिनंदन

भारताच्या प्राणवायूत, आदर्शात सर्वत्र प्रभू श्रीराम आणि अयोध्येचं ऐतिहासिक महत्त्व आहे. भविष्यात भाविकांची संख्या आणि श्रद्धा पाहता, सरकारने निर्णय घेतला आहे, अयोध्या कायद्यानुसार अधिगृहित सर्व जमीन 67 एकर ज्यामध्ये आत आणि बाहेरील अंगणाचा समावेश आहे, ती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राला सोपवण्यात येईल, असं मोदींनी सांगितलं होतं.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सरकारने जन्मभूमीत राम मंदिर उभारण्यासाठी योजना तयार केली आहे. श्री राम मंदिर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र स्थापन करण्यात येईल. हा ट्रस्ट पूर्णपणे स्वतंत्र असेल. सुप्रीम कोर्टाचे निर्देश, अनेक चर्चांनंतर आम्ही अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन मंजूर केली आहे, असंही मोदींनी सांगितलं होतं.

(PM Narendra Modi to lay foundation stone of Ayodhya Ram Mandir Temple)

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.