AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या काही सेकंदामध्ये दूर करा!

दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली हवी असेल तर घरगुती उपाय करा आणि त्वचा चांगली मिळवा.

Skin Care : 'हा' फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या काही सेकंदामध्ये दूर करा!
फेसपॅक
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 16, 2021 | 9:10 AM
Share

मुंबई : दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली हवी असेल तर घरगुती उपाय करा आणि त्वचा चांगली मिळवा. आपल्या चेहऱ्यासाठी फळांचे फेसपॅक नेहमीच फायदेशीर असतात. फळांच्या फेसपॅकमुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो. यामुळे आपण नेहमी फळांचे फेसपॅक वापरले पाहिजेत. (Papaya face pack is beneficial for the skin)

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, पपई खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच पपई आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. आपण पपईचे फेसपॅक चेहऱ्याला लावून त्वचा सुंदर आणि तजेलदार मिळू शकतो. पपईचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला 1/4 पपई, 1 चमचे मध आणि 1 चमचे लिंबाची रस आवश्यक आहे. पपईची बारीक पेस्ट तयार करा. आता त्यात मध आणि लिंबू घालून पुन्हा मिक्स करावे.

हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा. हे मिश्रण 20 चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. यामुळे चेहरा सुंदर होण्यास मदत होते. पपईमध्ये पपाइन नावाचा घटक असतो जो त्वचेतून जादा तेल काढून टाकण्यास मदत करतो. हे चेहऱ्यावरील त्वचेला हायड्रेट करते. हे डी-टॅन पॅक म्हणून देखील कार्य करते. पपईचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी पपईचा गर, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा कोरफडीचा गर आवश्यक असेल.

हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. केळी, कलिंगड, आंबा आणि कोरफडचा फेसपॅक आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार होण्यास मदत होते. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यासाठी अर्धी केळी, दोन काप कलिंगड, एक काप आंबा आणि तीन चमचे कोरफडीचा गर घ्या आणि यासर्वांची चांगली पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यासह मानेवर लावा. साधारण एक तास ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Papaya face pack is beneficial for the skin)

Follow Us
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?