AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: लातूरचा पारा 42 अंशावर, निलंगा-औसा मार्गावर Burning Car चा थरार

रविवारी भर दुपारी मारुतीची स्विफ्ट डिझायर या चारचाकीतून तिघेजण हे निलंग्याहून लातूरकडे निघाले होते. दरम्यान, कार ही वाघोली पाटीजवळ येताच अचानक पेट घेतला. वाढते ऊन आणि इंजिन जवळील शॉर्टसर्किटमुळेच हे झाल्याचा अंदाज आहे. मात्र, गाडीच्या इंजिनने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी बाजूला घेतली आणि गाडीतील तिघेही बाहेर आले.

Video: लातूरचा पारा 42 अंशावर, निलंगा-औसा मार्गावर Burning Car चा थरार
निलंगा-लातूर मार्गावर धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: May 09, 2022 | 10:31 AM
Share

लातूर : विदर्भापाठोपाठ (Marathwada) मराठवाड्यातही उन्हाच्या झळा ह्या वाढत आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर जिल्ह्याचा पारा 40 शी पार गेला आहे. अशाच रखरखत्या (Temperature) उन्हामध्ये निलंगा-औसा मार्गावरील वाघोली पाटीजवळ भर दुपारीच धावत्या (Car Burning) कारने पेट घेतल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकरामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, या कारमधून तिघेजण प्रवास करीत होते. मात्र, कारला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात येताच गाडी थांबवून तिघेही बाहेर पडले. इंजिनच्या आजू-बाजूला असलेल्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेत प्रसंगवधान दाखविल्याने कोणीही जखमी झाले नाही.

निलंग्याहून तिघेजण निघाले होते लातूरला

रविवारी भर दुपारी मारुतीची स्विफ्ट डिझायर या चारचाकीतून तिघेजण हे निलंग्याहून लातूरकडे निघाले होते. दरम्यान, कार ही वाघोली पाटीजवळ येताच अचानक पेट घेतला. वाढते ऊन आणि इंजिन जवळील शॉर्टसर्किटमुळेच हे झाल्याचा अंदाज आहे. मात्र, गाडीच्या इंजिनने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी बाजूला घेतली आणि गाडीतील तिघेही बाहेर आले. यामध्ये सर्वजण सुखरुप असले तरी गाडीचे मात्र, मोठे नुकसान झाले आहे. शिवाय गाडीमध्ये अग्निशमनाचे कसलेही साहित्य नसल्याने कारला लागलेली आग विझवण्यात यश आले नाही .

घटनेचे नेमके कारण काय?

इंजिनच्या आजू-बाजूला असलेल्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग पसरली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. असे असले तरी वाढत्या उन्हामुळे तर ही घटना घडली नाही अशी शंका उपस्थित होत आहे. कारण गेल्या 8 दिवसांपासून उन्हाच्या झळा ह्या वाढत आहेत. शिवाय भर दुपारीच ही कार लातूरकडे मार्गस्थ होत असताना रखरखत्या उन्हामध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट की आणखीन काही हा सवाल कायम आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच