Sanjay Raut : बाबरी कुणी पाडली? फडणवीस म्हणतात मी तिथे होतो, आता संजय राऊतांनी थेट सामनाचे जुने पेजच ट्विटरवर टाकले

| Updated on: May 02, 2022 | 3:58 PM

शिवसेनेवर टीका करताना फडणवीस म्हणाले, खरं तर तुम्ही म्हणजे हिंदू नाही. पण मी असं म्हणणार नाही. कारण मला हिंदुंची संख्या कमी करायची नाही. पण हे नक्की म्हणतो की तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, असा घणाघातही फडणवीस यांनी यावेळी केलाय.तसेच बाबारी पाडल्यावरूनही त्यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं. याला आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) सामनाचे जुने पेज ट्विटरवर शेअर करत उत्तर दिलंय.

Sanjay Raut : बाबरी कुणी पाडली? फडणवीस म्हणतात मी तिथे होतो, आता संजय राऊतांनी थेट सामनाचे जुने पेजच ट्विटरवर टाकले
फडणवीसांना राऊतांचं ट्विटरवरून उत्तर
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या हिंदूत्व (Hindutva), हनुमाना चालीसा, मशीदीवरील लाऊडस्पीकर आणि नव्याने पुन्हा चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे बाबरी आम्ही पाडली…काल दोन मोठ्या हायव्होल्टेज सभा पार पडल्या. त्यात औरंगाबादेतल्या राज ठाकरेंच्या सभेने पुन्हा हिंदुत्वावरून आणि मशीदीवरील लाऊडस्पीकरवरून रान उठवलं. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई सभा गेत महाविकास आघाडीला बुस्टर डोस दिला. या दोन्ही सभांनी काल राजकारणाचा पारा हा भर दुपारच्या उन्हाच्या पाऱ्यापेक्षाही जास्त वाढवाला होता. शिवसेनेवर टीका करताना फडणवीस म्हणाले, खरं तर तुम्ही म्हणजे हिंदू नाही. पण मी असं म्हणणार नाही. कारण मला हिंदुंची संख्या कमी करायची नाही. पण हे नक्की म्हणतो की तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, असा घणाघातही फडणवीस यांनी यावेळी केलाय.तसेच बाबारी पाडल्यावरूनही त्यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं. याला आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) सामनाचे जुने पेज ट्विटरवर शेअर करत उत्तर दिलंय.

अडवाणींची मुलाखत शेअर केली

शिवसेना दावा करते की बाबरी आम्ही पाडली, पण वास्तवात एकही शिवसैनिक तिथे नव्हता, अशी टीका फडणवीसांनी केली. त्याला राऊतांनी उत्तर देताना अडवाणींनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप नेते कसे नंतर गेले हे सांगताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

संजय राऊतांचंं पहिलं ट्विट

सामनातल्या जुन्या बातम्यात काय?

त्यानंतर संजय राऊतांनी सामनाच्या पेपरचे काही जुने पेजही ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यात “बमों से लैस शिवसेना कार्यकर्ता अयोध्या जायेंगे”, शिवसेना के प्रदेश प्रमुख के घर पर छापा” अशा आशयाच्या बातम्या आहेत, ज्यातून शिवसेनेचा बाबरी पाडण्यातला सहभाग दिसून येत असल्याचे राऊत सांगत आहेत. आणि या पोस्टला राऊतांनी “आता बोला..अब बोलो…” असे कॅप्शनही दिले आहे. त्यामुळे आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सामनाच्या जुन्या बातम्या टाकल्या

शिवसेनेकडून सोशल मीडिया पोस्ट