सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका, म्हणाले, सामना वर्तमानपत्र नाही तर…

| Updated on: Oct 07, 2022 | 2:40 PM

उद्धव ठाकरे यांनी मोजून 150 च्या वर शिव्या किंवा तत्सम शब्दाचा वापर केला.

सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका, म्हणाले, सामना वर्तमानपत्र नाही तर...
सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका
Image Credit source: t v 9
Follow us on

मुंबई : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज शिवसेनेवर (Shiv Sena) टीका केली. मुनगंटीवार म्हणाले, सामना हे वर्तमान पत्र राहीलं नाही. ते आता शिवसेनेचं जाहिरात पत्र झालं आहे. शिवसेनेच्या मनात सत्ता गेल्याची जी खदखद आहे ती सामनातून व्यक्त केली जात आहे. 2019 मध्ये जनतेच्या कौलाचा अवमान करत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरुद्ध निर्णय घेतला. एका खुद्द शिवसैनिकाने खुद्दारी केली.

विचारांचं सोन देतो, असं म्हणत विजया दशमीचा उत्सव हा शिमग्याचा उत्सव करण्याचं काम केलंय. हे सर्वांनी बघीतलंय. हे कोणतं वैचारिक सोनं आहे, असा उपरोधिक टोलाही मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला.

उद्धव ठाकरे यांनी मोजून 150 च्या वर शिव्या किंवा तत्सम शब्दाचा वापर केला. तुमच्या कुटुंबातील लोक जर मंचावर बसत असतील तर दुसऱ्यानं बोलण्याऐवजी स्वतः चिंतन करण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. मला याबद्दल फार माहीत नाही. म्हणून प्रतिक्रिया देता येणार नाही. कायद्याच्या चौकटीत जे अपेक्षित असेल त्या पद्धतीने आयोग निर्णय देईल. किती वेळा मुदत वाढ द्यायाची याचा ही विचार आयोग करेल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले, जनादेशाचा आदर कुणी केला? जाहीर सभेमध्ये मोदीजींच्या समोर देवेंद्र हेच मुख्यमंत्री असं सांगत होते. तेव्हा तुम्हाला आवाज येत नव्हता का? तेव्हा आपण काहीच बोलला नाही.

तुम्ही चुकले हे जर मान्य केलं तर तुम्हाला उत्तर सापडेल. पण आता भाजप आणि उद्धव ठाकरे रेल्वेचे दोन रूळ आहेत, जे सोबत येऊ शकत नाहीत.