दोन टर्म आमदार असलेल्या नागो गाणार यांचा पराभव का झाला?; राजेंद्र झाडे यांची भूमिका काय?

भाजपमधील शिक्षक आघाडीमधूनही त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र अखेरीस गाणार हेच उमेदवार झाले. भाजपनेही त्यांना शेवटच्या क्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला होता. पण, गाणार निवडून येऊ शकले नाही.

दोन टर्म आमदार असलेल्या नागो गाणार यांचा पराभव का झाला?; राजेंद्र झाडे यांची भूमिका काय?
नागो गाणार
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 6:14 PM

नागपूर : नागपूर शिक्षक मतदार संघात सुधाकर आडबाले (Sudhakar Adbale) हे विजयी ठरले. नागो गाणार ( Nago Ganar) यांनी त्यांनी पराभूत केले. गाणार महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे नेते आहेत. गाणार गेले दोन टर्म नागपूर विभाग शिक्षक मतदार (Teacher’s Constituency) संघातून आमदार आहेत. एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक आक्रमकता नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. या वेळेला महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेतून अजय भोयर आणि इतर कार्यकर्त्यांनी ही उमेदवारी मागितली होती. मात्र गाणार यांनी कोणाचीही डाळ शिजू दिली नाही आणि उमेदवारी स्वतःकडे ठेवली. त्यामुळं शिक्षक परिषदेतील काही जण नाराज होते. शिवाय भाजपमधील शिक्षक आघाडीमधूनही त्यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र अखेरीस गाणार हेच उमेदवार झाले. भाजपनेही त्यांना शेवटच्या क्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला होता. पण, गाणार निवडून येऊ शकले नाही.

राजेंद्र झाडे यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं

तिसऱ्या क्रमांकाचे मतं मिळविणारे राजेंद्र झाडे हे शिक्षक भारतीचे उमेदवार होते. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या मागील निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. शिवाय नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही ते उभे झाले होते. मात्र काँग्रेसच्या मागणीनंतर त्यांनी काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्यासाठी माघार घेतली होती.

राजेंद्र झाडे यांच्या मतांचा फटका कुणाला

यंदा त्यांना काँग्रेसच्या पाठिंब्याची अपेक्षा होती. काँग्रेसने अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. मात्र या निवडणुकीत त्यांना अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. झाडे यांना मिळालेले कमी मत हे सुधाकर आडबाले यांच्या विजयामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा ठरला.

पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीनंतर, प्रमुख उमेदवारांना मिळालेली मतं

१) सुधाकर अडबाले (अपक्ष, महाविकास आघाडी समर्थित) : १४,०६९

२) नागो गाणार (अपक्ष) : ६,३६६

३) राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष) (युनायटेड ) : २७४२

४) अजय भोयर (अपक्ष) : १०९०

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.