
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना हिने मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. सुरभी चंदना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सुरभी चंदना सोशल मीडियावर सक्रिय असते.

सुरभी चंदना हिने काही दिवसांपूर्वीच जयपुरमध्ये लग्न केले. सुरभी चंदनाने करणसोबत लग्न केले. लग्नाला अवघे काही दिवसच झालेले असतानाच अभिनेत्री पतीला वैतागली असल्याचे बघायला मिळतंय.

सुट्टी घालून अभिनेत्री पतीसोबत मुंबईत दाखल झालीये. नुकताच सुरभी चंदना हिने इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले. यामध्ये ती पतीची तक्रार करताना दिसतंय.

फोटो शेअर करत अभिनेत्रीने म्हटले की, करण शेवटच्या क्षणापर्यंत गाडीत कधीच इंधन टाकत नाही. हेच नाही तर इंधन कमी असल्याने तिला कारची खिडकी उघडी ठेवावी लागली, एसीशिवाय तिला प्रवास करावा लागतोय.

शेवटी अभिनेत्रीने पतीला मजाकमध्ये 'सुधर जा' म्हटले आहे. सुरभी चंदना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना सुरभी दिसते.