कल्याण लोकसभेची जागा कुणाकडे भाजप की शिंदेगट?, श्रीकांत शिंदे म्हणाले…

| Updated on: Sep 11, 2022 | 5:21 PM

शिंदेगट आणि भाजप एकत्र आल्यानंतर निवडणुकांमध्ये जागा वाचप कसं होणार याची अनेकांना उत्सुकता आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलंय.

कल्याण लोकसभेची जागा कुणाकडे भाजप की शिंदेगट?, श्रीकांत शिंदे म्हणाले...
Follow us on

मुंबई : शिंदेगट आणि भाजप एकत्र आल्यानंतर येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Loksabha Election 2024) जागा वाटप कसं होणार याची अनेकांना उत्सुकता आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shreekant Shinde) यांनी उत्तर दिलंय. ही जागा शिंदेगटाकडेच राहील आणि आपणच उमेदवार असू, असं शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं. कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपाचा दावा असे वक्तव्य काही भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले आहेत. मात्र हा शिवसेनेचा मतदार संघ असून येथील खासदार हे शिंदे असून 2024 मध्ये आपणच युतीचे उमेदवार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

दिवसातील 20 तास शिंदेसाहेब काम कसा करू शकतात? असं अनेकांना वाटतं. या सगळ्या गोष्टी आता डोळ्यांमध्ये खुपायला लागलेल्या आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. मी याआधीही सांगितलं आहे की ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है!, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यामध्ये जे सरकार आले ते मेजॉरिटीचं सरकार आहे. बाकी लोक बोलत असतात. त्यांचं ते कामच आहे. विरोधी बाकावर बसल्यापासून त्यांच्याकडे करण्यासारखं काहीही उरलेलं नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर टीका करतात, असंही श्रीकांत शिंदे म्हणालेत.

आता शिंदेसाहेब चांगलं काम करत आहेत. विरोधकांना पूर्ण वेळ केवळ शिंदेसाहेबच दिसतात. स्वप्नामध्ये पण शिंदे साहेब येतात. सगळ्यांच्या म्हणजे शिंदेसाहेब गणेश उत्सवामध्ये ज्या प्रकारे फिरले. फक्त गणेश उत्सव नाही, त्याबरोबर शासकीय कामकाज सरकारचे निर्णय घेण्याचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा माणूस काम कसा करू शकतो? असा प्रश्न विरोधकांना पडलाय,असंही शिंदे म्हणालेत.