जेव्हा ममता बॅनर्जींच्या ‘अच्छी फाईट कर रहे हो’वर उद्धव म्हणाले होते ‘लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूँ’

देशभरातील विरोधीपक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची ऑगस्ट 2020 मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यात हा संवाद झाला होता. (Mamata Banerjee Praised Uddhav Thackeray)

जेव्हा ममता बॅनर्जींच्या 'अच्छी फाईट कर रहे हो'वर उद्धव म्हणाले होते 'लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूँ'
ममता बॅनर्जी. उद्धव ठाकरे


मुंबई : ‘ममतादीदी बंगालची वाघीण आहेत’ असं म्हणत शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) रिंगणात उतरणार नसल्याचं स्पष्ट केलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) पाठिंबा देत असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता यांचे स्नेहबंध जुने आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशभरातील विरोधीपक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची ऑगस्ट 2020 मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. तेव्हा उद्धव यांनी प्रांजळपणे ममतादीदींना परवानगी मागितली असता, “उद्धवजी आप बहुत अच्छा फाईट कर रहे है” अशी स्तुतिसुमने त्यांनी उधळली. तेव्हा उद्धव ठाकरे “लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं” असे अभिमानाने म्हणाले. (When West Bengal CM Mamata Banerjee Praised Shivsena Maharashtra CM Uddhav Thackeray)

काय झाला होता संवाद?

देशभरातील विरोधीपक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची ऑगस्ट 2020 मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. उद्धव ठाकरे यांना कॅबिनेटची बैठक घ्यायची होती, त्यामुळे सोनिया गांधींनी ममता बॅनर्जी यांना सांगितलं की आधी उद्धव यांना बोलू द्या. त्यावर उद्धव ठाकरे यांनी ममता दीदींना विचारले होते, की ‘इजाजत है क्या दीदी?’. त्यावर ममता यांनी “उद्धवजी, आप बहुत अच्छा फाईट कर रहे है” अशा शब्दात  त्यांचे कौतुक केले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांनीही “लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं” असे अभिमानाने सांगितले होते.

“केंद्र सरकारशी लढायचे की घाबरुन बसायचे, हे आपण ठरवायला हवे” असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत मांडले होते. “संकट आलं की आपण एकत्रित येतो. पण आपल्याला एकत्रित यायला संकटाची गरज कशाला आहे? आपण एरवीसुद्धा भेटत राहिले पाहिजे, ज्यामुळे संकटच घाबरुन म्हणेल की हे लोक एकत्र आहेत” असंही ते म्हणाले होते.

शिवसेनेकडून पश्चिम बंगालची निवडणूक न लढण्याची घोषणा

“शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अनेक जणांच्या मनात कुतूहल आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला. सद्यस्थिती पाहता ही निवडणूक ‘दीदी विरुद्ध सगळे’ अशी होणार आहे. सर्व एम – मनी (पैसा), मसल्स (शक्ती) आणि मीडिया ‘म’मतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता दीदींना गर्जना करणारे यश चिंतीतो. आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत.” अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

ममतादीदी बंगालची वाघीण, शिवसेनेचा तृणमूलला पाठिंबा, पश्चिम बंगालच्या मैदानात न उतरण्याची घोषणा

(When West Bengal CM Mamata Banerjee Praised Shivsena Maharashtra CM Uddhav Thackeray)