IPL 2025 DC vs MI Live Streaming : दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या

Delhi Capitals vs Mumbai Indians Live Streaming: यजमान दिल्ली आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आपल्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन हात करणार आहे. दिल्लीकडे हा सामना जिंकून सलग पाचवा सामना जिंकण्याची संधी आहे.

IPL 2025 DC vs MI Live Streaming : दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
DC vs MI Live Streaming Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 12, 2025 | 5:59 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स अजिंक्य आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत. अक्षर पटेलने आपल्या नेतृत्वात दिल्लीला चारही सामन्यात जिंकवलंय. दिल्ली आता पाचव्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. दिल्ली आपला पाचवा सामना घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. दिल्ली या सामन्यात जिंकून सलग पाचवा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. तर दुसर्‍या बाजूला मुंबई कमबॅक करण्यासाठी तयार आहे. मुंबईने खेळलेल्या 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबईसमोर कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कधी?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला रविवारी 13 एप्रिलला आयोजित करण्यात आला आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळवण्यात येणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहता येईल?

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.

दिल्ली कॅपिटल्स संघ : अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, करुण नायर, मोहित शर्मा, दुष्मंथा चमीरा, अजय जाधव मंडल, दर्शन नळकांडे, समीर रिझवी, डोनोवन फरेरा, त्रिपुराण विजय, मानवंथ कुमार एल, विपराज निगम आणि माधव तिवारी.