Pravin Darekar यांच्या राजीनाम्यासाठी AAP चे नेते आक्रमक, पोलिसांकडून कार्यकर्त्याची धरपकड

| Updated on: Mar 30, 2022 | 4:46 PM

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून सतत आरोप होत आहेत. मुंबै बँकेत (Mumbai Bank case) दरेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी (AAP) दरेकरांविरोधात आक्रमक झाली आहे. त्यांनी दरेकरांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे.

Follow us on

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून सतत आरोप होत आहेत. मुंबै बँकेत (Mumbai Bank case) दरेकरांनी घोटाळा केल्याचा आरोप करत आम आदमी पार्टी (AAP) दरेकरांविरोधात आक्रमक झाली आहे. त्यांनी दरेकरांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. या आंदोलनावेळी पोलिसांकडून आंदोलनकांची धरपकड करण्यात आली. यावेळी दरेकरांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लागवले आहेत. तर प्रवीण दरेकर चोर है…गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है…च्या जोरदार घोषणा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या. यावेळी आंदोलकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत आपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीही दरेकरांवर सतत आरोप करत आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टीने यात उडी घेतल्याने आगामी निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे.