CJP : ….ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
सीजेपीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जेलभरो आंदोलन पुकारले आहे. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली, ज्यामुळे सीजेपी आक्रमक झाली आहे. ठाकरे सेनेने सीजेपीला पाठिंबा दिला असून, अभिजीत दिपके यांनी शिवाजी पार्कमधील सभांच्या परवानगीवरून पोलिसांच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुंबईत 2 ऑक्टोबर रोजी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) च्या जेलभरो आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यानंतर सीजेपी आक्रमक झाली असून, आता निवडणूक आयोगाविरोधात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या आंदोलनाला ठाकरे सेनेने पाठिंबा दर्शवला आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारताना शिवाजी पार्कमध्ये (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत, असे पत्राद्वारे सीजेपीला कळवले आहे. यावर, अभिजीत दिपके यांनी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी ट्वीट करत सवाल केला की, “एकनाथ शिंदे यांच्या सभेला शिवाजी पार्कमध्ये परवानगी कशी दिली गेली?” त्यांनी शिंदेंच्या सभेचा व्हिडिओ देखील पोस्ट केला. नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी असे प्रकार अस्वीकार्य असल्याचे दिपके यांनी म्हटले आहे. परवानगी नाकारली असली तरी, सीजेपी 2 ऑक्टोबरला जेलभरो आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
