Navneet Rana vs Owaisi : महापालिकेच्या प्रचारात 6-6 मुलांचं चॅलेंज! नवनीत राणा आणि ओवेसी यांच्यात जुंपली
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात खासदार नवनीत राणा आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यात बालसंख्या मुद्द्यावरून शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. राणा यांनी हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले, तर ओवेसींनी याला आव्हान देत आपल्या सभांमधून विविध राजकीय मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सध्या मुलांच्या संख्येवरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हिंदूंना किमान तीन ते चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. राणा यांच्या या विधानावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिले. आपण सहा मुलांना जन्म दिला असून, इतरांनाही अधिक मुले जन्माला घालण्यापासून कोणी थांबवत नसल्याचे त्यांनी म्हटले. राणा यांनी ओवेसींच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, जास्त मुले जन्माला घालण्याची चर्चा करणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. या शाब्दिक युद्धामुळे निवडणुकीच्या प्रचारात नवा मुद्दा उपस्थित झाला असून, दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका

