हत्तीच्या पिल्लाला ‘चिवा’, माकडाला ‘चंपा’ नाव ठेवू; Kishori Pednekar यांचं Chitra Wagh यांना उत्तर

| Updated on: Jan 20, 2022 | 5:55 PM

हत्तीच्या पिल्लाला चंपा नाव ठेऊ, आणि एक माकडाचं पिल्लू येणार आहे त्याचं चिवा ठेऊ, असं सांगतानाच केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणं सोडा असा सल्लाही महापौरांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.

Follow us on

YouTube video player

मुंबई: राणीबागेत जन्माला आलेल्या पेंग्विन आणि वाघाचं बारसं करण्यात आलं आहे. त्यांना इंग्रजी नावे देण्यात आल्याने त्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महापालिकेवर टीका केली आहे. तर हत्तीच्या पिल्लाचं चंपा आणि माकडाचं नाव चिवा ठेवू, असं म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. भाजप टीका करतंय ना मराठी नावं ठेवायला हवी, मग पुढच्या वेळी चंपा आणि चिवा नाव ठेऊ. हत्तीच्या पिल्लाला चंपा नाव ठेऊ, आणि एक माकडाचं पिल्लू येणार आहे त्याचं चिवा ठेऊ, असं सांगतानाच केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणं सोडा असा सल्लाही महापौरांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.