AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KISAN CREDIT CARD : केंद्र सरकारच्या योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग, असे मिळवा किसान क्रेडीट कार्ड

सर्वसामान्य शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळावा हा उद्देश केंद्र सरकारचा आहे. त्याच अनुशंगाने प्रयत्नही केले जात आहे. विशेषत: मोदी सरकारने किसान क्रेडीट कार्डवर अधिकचा भर दिलेला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सावकराकडून कर्ज घेण्याची वेळ येत नाही. शेती व्यवसयाशी या योजनेचा लाभ मिळण्याची तरतूद तर आहेच पण आता पशूपालक आणि मासे उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

KISAN CREDIT CARD : केंद्र सरकारच्या योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग, असे मिळवा किसान क्रेडीट कार्ड
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 1:18 PM
Share

मुंबई : सर्वसामान्य शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळावा हा उद्देश केंद्र सरकारचा आहे. त्याच अनुशंगाने प्रयत्नही केले जात आहे. विशेषत: मोदी सरकारने (Kisan Credit Card) किसान क्रेडीट कार्डवर अधिकचा भर दिलेला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सावकराकडून कर्ज घेण्याची वेळ येत नाही. ( Interest Rate Concession) शेती व्यवसयाशी या योजनेचा लाभ मिळण्याची तरतूद तर आहेच पण आता पशूपालक आणि मासे उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरु आहे. मार्च 2020 ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये देशभरात 2 कोटी 60 लाख 59 हजार 687 शेतकऱ्यांनी हे उपयोगी कार्ड काढलेले आहे. यामध्ये सर्वाधिक 39 लाख 49 हजार 144 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. त्यानंतर राजस्थान, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथील शेतकऱ्यांनी हे उपयोगी कार्ड काढलेले आहे.

कमी व्याजदरात अधिकचे कर्ज

शेती व्यवसयात गुंतवणूक करण्यासाठी गरज असते ती पैशाची. मात्र, हीच गरज भागली जात नाही म्हणून केंद्र सरकारने कमी व्याजदरात अधिकचे कर्ज मिळावे अशी सोय केली आहे. यामध्ये जर शेतकऱ्यांनी अद्यापही भाग घेतला नसला तरी त्यांना फक्त जवळच्या सहकारी किंवा सरकारी बॅंकेत जाऊन अर्ज करायचा आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेलाच हे केसीसी जोडले गेले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सोपी झालेली आहे. ‘किसान सन्मान निधी’ ज्या बॅंकेत तुमचा जमा होतो तेथेच याचादेखील अर्ज मिळणार आहे. तो अर्ज भरुन बॅंकेत जमा करावा लागणार आहे. त्याकरिता काही कागदपत्रांची देखील आवश्यकता आहे.

आवश्यक कागदपत्रे

– बॅंकेतून घेतलेला अर्ज पूर्ण भरावा लागणार आहे. त्यासोबत ओळख प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. यामध्ये मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड यापैकी कोणतेही असले तरी अर्ज दाखल करता येणार आहे. तर इतर कोणत्याही बँकेत कर्जदार नाहीत असे प्रतिज्ञापत्र म्हणजेच NO Dues चे प्रमाणपत्र. व अर्जदाराचा फोटो ही कागदपत्रे लागणार आहेत.

कोण पात्र आहे, अर्ज कुठे असेल

– शेती करणारे किंवा सामूहिक शेती करणारे दोन्ही वैयक्तिक शेतकरी त्यासाठी पात्र आहेत. – बटईने शेती करणारे आणि बचत गटाच्या माध्यमातून शेती करणारे केसीसी योजनेचा लाभ घेऊ शकतात. – सर्व सरकारी, खासगी, सहकारी आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये हे केसीसी तयार केले जाणार आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. – शेतकरी आपले सुविधा केंद्र (CSC) या ठिकाणी देखली अर्ज करु शकतात. – पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसायासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. – केसीसी कार्डधारकांना शेतीसाठी कर्जाची मर्यादा तीन लाख रुपये आहे.

फक्त 15 दिवसांच्या आत होणार कार्डची प्रक्रिया

आवश्यक दस्तऐवजासह अर्ज स्वीकारल्यानंतर बँक व्यवस्थापनाला 15 दिवसांच्या आत केसीसी तयार करावे लागणार आहे. कृषी मंत्रालयाने बॅंकांना तसे निर्देश दिले आहेत. एवढेच नाही तर याकरिता कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. शिवाय अर्ज दाखल करण्यापासून लाभार्थ्याच्या हातामध्ये पडेपर्यंत बॅंकांची जबाबदारी राहणार आहे. यापूर्वी 4 ते 5 हजार रुपये घेतले जात होते. एसबीआय (SBI), पीएनबी (PNB), एचडीएफसी (HDFC) आणि आयसीआयसीआय (ICICI) सह सर्व बँका केसीसी तयार करतात.

व्याज किती घेतो?

किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या रकमेवरील व्याजदर 9 टक्के व्याज आहे. यामध्ये सरकार 2 टक्के सवलत देते. जो वेळेवर पैसे परत करतो त्याला आणखी 3 टक्के सूट मिळते. अशा प्रकारे केवळ शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी केवळ 4 टक्के व्याज राहते.

संबंधित बातम्या :

महाबीजचा मोठा निर्णय : राज्यभरातील बिजोत्पादक बियाणांच्या दरावर काढला तोडगा, बोनसचाही लाभ

Vineyard : अवकाळी, डाऊनी मिल्डयु नंतर आता द्राक्ष बागायतदारांसमोर नवेच संकट, काय आहे उपाययोजना ?

देशी अन् गोल्डन सीताफळाची चवच न्यारी, मुख्य पिकातून नाही पण हंगामी पिकांतून शेतकऱ्यांचे वाढले उत्पन्न

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.