AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळात बी पेरण्याची मानसिकता ठेवल्यास खरा बदल घडतो, डॉ. प्रीती अदानी यांचे हाँगकाँगमधील परिषदेत प्रेरणादायी भाषण

हाँगकाँगमध्ये एशियन व्हेंचर फिलान्थ्रॉपी नेटवर्क (AVPN) शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अदानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदानी यांनी भाग घेतला होता. यावेळी त्यांनी प्रेरणादायी भाषण

दुष्काळात बी पेरण्याची मानसिकता ठेवल्यास खरा बदल घडतो,  डॉ. प्रीती अदानी यांचे हाँगकाँगमधील परिषदेत प्रेरणादायी भाषण
priti-adani-global-philanthropists-co-builders-change
| Updated on: Sep 09, 2025 | 8:35 PM
Share

हाँगकाँगमध्ये एशियन व्हेंचर फिलान्थ्रॉपी नेटवर्क (AVPN) शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अदानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदानी यांनी भाग घेतला होता. यावेळी त्यांनी परोपकाराच्या पारंपारिक व्याख्येला आव्हान देत म्हटले की, दान करण्यापेक्षा जबाबदारी आणि भागीदारी महत्वाची आहे. त्यांच्या भाषणाने केवळ उपस्थितांची मने जिंकली नाहीत तर विकास आणि समाजसेवेच्या ध्येयाला एक नवीन दिशा दिली.

कच्छची महिला आणि दुष्काळात पेरलेली बियाणे

डॉ. अदानी यांनी गुजरातच्या कच्छ मधील एका कथेने आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यांनी म्हटले की, ‘मी एका महिलेला वाळवंटातील ओसाड जमिनीवर बी पेरताना पाहिले होते. मी तिला विचारले की या कोरड्या जमिनीत बी का पेरत आहे? तेव्हा त्या महिलेने उत्तर दिले की, एक दिवस पाऊस नक्कीच येईल. जर जमिनीत बी नसेल तर पाऊसही वाया जाईल. या कथेनंतर डॉ. अदानी म्हणाल्या की अशी विचारसरणी प्रत्यक्षात बदलाचा पाया रचते.

डॉक्टर ते सामाजिक कार्यकर्त्या असा प्रवास

डॉ. प्रीती अदानी यांनी अहमदाबादमध्ये दंतवैद्य म्हणून कारकीर्द सुरू केली होती. कालांतराने त्यांनी पती गौतम अदानी यांच्या राष्ट्र उभारणीच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेत आपले जीवन समाजसेवेसाठी अर्पण केले. प्रीती यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘गौतम अदानी यांना असं वाटतं की, खरा विकास केवळ पायाभूत सुविधा किंवा व्यवसायात लपलेला नाही तर शाळा, रुग्णालये आणि उपजीविकेच्या शाश्वत विकासात आहे. याच विचाराच्या आधारावर 1996 मध्ये अदानी फाउंडेशनची स्थापना झाली.

अदानी फाउंडेशनचे उल्लेखणीय काम

अदानी फाउंडेशन ही आज भारतातील सर्वात मोठ्या सामाजिक संस्थांपैकी एक आहे. ही संस्था शिक्षण, आरोग्य, पोषण आहर, शाश्वत रोजगार , ग्रामीण पायाभूत सुविधा आणि हवामान बदल या क्षेत्रात काम करत आहे. आतापर्यंत ही संस्था 7000 पेक्षा जास्त गावे आणि 96 लाख लोकांपर्यंत पोहोचली आहे. या आकडेवारीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक बदलामागे कथा लपलेली आहे असं अदानी यांनी सांगितले.

डॉ. अदानी यांनी तीन प्रेरणादायी कथा सांगितल्या

  • वंश गुजरात: वंश हा 3 वर्षांचा मुलगा असून त्याचे वजन फक्त आठ किलो होते. संस्थेच्या एका स्थानिक महिला स्वयंसेविकेने त्याच्या आईला पोषणाबद्दल योग्य माहिती दिली आणि आता हा मुलगा पुन्हा निरोगी बनला आहे.
  • रेखा, महाराष्ट्र: रेखा ही दोन मुले असणारी विधवा आहे. ती आता गावातील पहिली महिला दूध शीतकरण केंद्र संचालक बनली आहे. तिने शंभराहून अधिक महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
  • सोनल, मुंद्रा: सोनल हिने अदानी शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने आयर्लंडमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आणि आता ती अॅपलमध्ये काम करत आहे. डॉ. प्रीती अदानी म्हणाल्या की, हे लोक आता इतरांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.

डॉ. प्रीती अदानी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाल्या की, बदल केवळ देणग्या देऊन होत नाही. खरा बदल तेव्हाच होजो जेव्हा आपण मदत घेणाऱ्यांपर्यंत पोहोचतो. जर सरकार, व्यवसायिक आणि समाज एकत्र आला तर आपण असे बदल घडवू शकतो ज्यांचा परिणाम अनेक पिढ्यावर होईल. आपल्याला दुष्काळातही बी पेरणारी पिढी बनावे लागेल, कारण तिला पाऊस येईल असा विश्वास आहे. जेव्हा पाऊस येईल तेव्हा इतिहास साक्ष देईल की कोणीतरी आशेचे बीज पेरले होते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.