मुंबई लोकलमधील लेडी पाकिटमारने पोलिसांना केले हैराण; जेलमध्ये रवानगी होताच झाले धक्कादायक खुलासे

या महिलेला शनिवारी जीआरपीच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कुर्ला टर्मिनस येथून कर्नाटकात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली.

मुंबई लोकलमधील लेडी पाकिटमारने पोलिसांना केले हैराण; जेलमध्ये रवानगी होताच झाले धक्कादायक खुलासे
इंदापूरमध्ये पोलिसाच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 09, 2022 | 1:38 AM

मुंबई : प्रवासामध्ये रोजच चोरीच्या घटना घडत असतात. यामुळे प्रवास करताना सावध राहण्याचा सल्ला प्रवाशांना दिला जातो. पोलीस आणि वाहतूक विभाग अशा घटना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मुंबईत चोरी (Theft)चे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. जीआरपीने ट्रेनमध्ये चोरी करणाऱ्या एका महिलेला अटक (Arrest) केली आहे. ही महिला लोकांच्या मौल्यवान दागिने (Jewellery) आणि वस्तू चोरून फरार होत असे. ट्रेनमधील प्रवाशांचे दागिने चोरणारी ही 28 वर्षीय आरोपी महिला मुंबईतील गुलबर्गा परिसरात राहते. जीआरपीने तिला अटक केली आहे.

कर्नाटकात पळून जाण्याच्या प्रयत्नात होती महिला

या महिलेला शनिवारी जीआरपीच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कुर्ला टर्मिनस येथून कर्नाटकात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मे महिन्यात एका 22 वर्षीय महिलेने आरोपी मुस्कान शेखविरुद्ध ठाणे जीआरपीमध्ये एफआयआर दाखल केला होता. यात आरोप केला होता की, ती अंबरनाथ स्टेशनवर ट्रेनमध्ये चढत असताना कोणीतरी तिची सोन्याची चैन चोरली.

आरोपी महिलेकडून चोरीचे दागिने हस्तगत

यानंतर जीआरपी महिलेचा शोध घेत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून महिलेची ओळख पटली आणि त्यानंतर प्रवाशांचे दागिने चोरण्यात तिचा सहभाग असल्याचे आढळून आले. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 379 (चोरीची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. एवढेच नाही तर पोलिसांनी महिलेकडून चोरीचे दागिनेही जप्त केले आहेत.