Video: चंद्रपूरमध्ये पुराच्या पाण्यात अडकली बस, 35 प्रवाशांच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद! शॉर्टकट मारणं अंगलट

| Updated on: Jul 13, 2022 | 12:12 PM

Chandrapur Flood Bus Video : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात ही थरारक घटना घडली.

Video: चंद्रपूरमध्ये पुराच्या पाण्यात अडकली बस, 35 प्रवाशांच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद! शॉर्टकट मारणं अंगलट
पुराच्या पाण्यात थरार...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यात खासगी बस अडकली. शॉर्टकट मारण्याच्या नादात पुराच्या पाण्यात ही बस अडकल्यानं बसमधील 35 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. सुदैवानं पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र त्यानंतरही बस पुराच्या (Flooded water) पाण्यातच अडकून होती. चंद्रपूर जिल्ह्यातल्या विरुर पोलीस ठाण्यातील पोलिसांना बस पुराच्या पाण्यात अडकली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य करण्यास सुरुवात केली. विरुर पोलीस ठाण्याच्या पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्त्वात अंधारातच बचावकार्य सुरु केलं होतं. पहाटे साडेपाच वाजता ही बस पुराच्या पाण्यात बंद पडली होती. दोन्ही बाजूला पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्यानं आता करायचं काय? असा प्रश्न या बसमधील प्रवाशांना (Private Bus in Flood Water Video) पडला होता. अखेर दोऱ्या बांधून बसमधील प्रवाशांना हळूहळू बाहेर काढण्यात आलं. पुराच्या पाण्यातून वाट काढत या प्रवाशांना अखेर पुराच्या पाण्यातील जीवदान देण्यात आलं

चालकाचा अतिउत्साह नडला!

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात ही थरारक घटना घडली. चिंचोली मार्गे ही खासगी बस हैदराबादला जाण्यासाठी निघाली होती. ही खासगी बस मध्य प्रदेशातून हैदराबादला जायला निघाली होती. यावेळी राजुरा येथील चिंचोली नाल्याच्या पुरात ही बस बंड पडली आणि अंधारातच पुराच्या पाण्यामध्ये अडकून होती. बस पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली होती.

बस चालकाला पुढे मार्ग बंद आहे, हे सांगितल्यानंतरही चालकानं ऐकलं नाही आणि बस पुढे नेली. अखेर सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही बस पुराच्या पाण्यात अडकली. मध्यप्रदेशातून शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातून चिंचोली मार्गे ही बस हैदराबादला जायला निघाली होती. खासगी बस पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर आता करायचं काय, असा प्रश्न निर्माण झाला होता.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पुराच्या पाण्यात अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून पुरुष वृद्ध लहान मुले व महिला यांना बाहेर काढलं. त्यानंतर दुसऱ्या एका बसमध्ये बसवून देत हैदराबादकडे या प्रवाशांना रवाना करण्यात आलं.

चंद्रपूर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचं कौतुक होतंय. दरम्यान, या घटनेमुळे पुराच्या पाण्यात वाहन घेऊन जाणं जीवावर बेतू शकतं, हे अधोरेखित झालंय.