आधी विजयने निशाला भोसकलं, मग विजयची विषारी औषध घेत आत्महत्या! आता 3 मुलांचं भविष्य अधांतरी

Nanded Crime : शुक्रवारी सकाळी पत्नीला भोसकून पतीनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं कासारपेठ परिसरात खळबळ माजली होती.

आधी विजयने निशाला भोसकलं, मग विजयची विषारी औषध घेत आत्महत्या! आता 3 मुलांचं भविष्य अधांतरी
नांदेडमधील खळबळजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 8:55 AM

नांदेड : मानसिक तणावातून पतीनं आत्महत्या (Husband Suicide) केली. विषारी औषध घेत आत्महत्या करण्याआधी पतीनं पत्नीला भोसकल्याचा (Husband killed wife) धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही घटना नांदेड (Nanded Crime News) जिल्ह्यामध्ये घडली आहे. पत्नीवर दवाखान्यात उपचार सुरु होता. दरम्यान, पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला गेला आणि मानसिक तणावातून पत्नीची हत्या करत पतीनं आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेनं संपूर्ण नांदेड हादरुन गेलंय. या दाम्पत्याला एकूण तीन मुलं असून या मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालाय. या मुलांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं असून आता त्यांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यातील कासारपेठ इथं ही धक्कादायक घटना घडलीय.

हत्येआधी काय घडलं?

शुक्रवारी सकाळी पत्नीला भोसकून पतीनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं कासारपेठ परिसरात खळबळ माजली होती. माहूर तालुक्यातील मौजे कासारपेठ येथील विजय गुलाब जाधव (33) व त्याची पत्नी निशा (29) हे दोघेही काल कासारपेठ शिवारातील शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान सकाळी साडे आठ ते नऊच्या सुमारास त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. याच दरम्यान शेतातील कामासाठी नेलेल्या धारदार हत्याराने त्याने पत्नीवर वार केले.

ही बाब शेजारील शेतात काम करीत असलेल्या अन्य शेतकऱ्यांनी पाहिली. त्यानंतर तडक या दोघांच्या दिशेने धाव घेतली. जखमी झालेल्या निशाला माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

दरम्यान 2 जून रोजी विलास हा शेतातून अज्ञात ठिकाणी पळून गेला होता. 3 जूनला सकाळी उमरा ते तोळा तांडा या दरम्यान असलेल्या नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सिंदखेड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

तीन मुलं पोरकी

निशा आणि विजय यांना एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आई-वडील यांचं छत्र हरपल्यानं ही तिन्ही मुलं पोरकी झाली आहेत.

किरकोळ कारणातून चाकूने भोसकल्यानंतर पती विजय फरार झाला होता. या दरम्यान जखमी असलेल्या निशाला अधिक उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आले. त्या दरम्यान पत्नी निशाचा मृत्यू झाल्याची अफवा कुणीतरी पसरवली, आता आपलं काही खंर नाही, या भीतीतून मग पती विजय ने स्वतःला संपवलं. या प्रकरणी सिंदखेड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.