Pune Rape: 5 महिन्यात 3 वेळा दहावीतील विद्यार्थीनीवर स्कूल बस चालकाचा बलात्कार! अखेर अटक, वाचा नेमकं काय घडलं?

Pune minor girl rape case : 16 जुलै रोजी 15 वर्षांची विद्यार्थीनी आरोपी स्कूल बस चालकाला भेटून रात्री उशिरा घरी परतली होती.

Pune Rape: 5 महिन्यात 3 वेळा दहावीतील विद्यार्थीनीवर स्कूल बस चालकाचा बलात्कार! अखेर अटक, वाचा नेमकं काय घडलं?
पुण्यात दहावीच्या विद्यार्थीनीवर बलात्कारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 2:32 PM

पुणे : पुण्यामध्ये 35 वर्षीय बस चालकाला अटक (Pune Crime News) करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थीनीचा बलात्कार केल्याप्रकरणी (Pune Rape case) या बस चालकाला अटक करण्यात आली. कोंडवा पोलिसांनी रविवारी याप्रकरणी अटकेची कारवाई केली. या बस चालकाला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 15 वर्षांच्या मुलीसी गोड बोलून या बस चालकानं मैत्री केली होती. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला होता. या मुलीसोबत त्याने संबंध ठेवल्याप्रकरणाचा खुलासाही धक्कादायक (School bus driver raped 10th standard girl) पद्धतीने झाला होता. 16 जुलै रोजी 15 वर्षांची विद्यार्थीनी आरोपी स्कूल बस चालकाला भेटून रात्री उशिरा घरी परतली होती. त्यावेळी या मुलीच्या आईला संशय आला. त्यानंतर या प्रकरणाचा हळूहळू उलगडा झाला. आईने मुलीची चौकशी केल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. अखेर पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आणि मग पुढील कारवाई केली गेली.

धक्क्दायक

पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी स्कूल बस ड्रायव्हरला रविवारी अटक केली होती. दरम्यान. मुलीच्या संमतीने संबंध ठेवल्याचा दावा आरोपी स्कूल बस चालकाने केला होता. पण बलात्कार प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या संमतीचा प्रश्नत येत नसल्यानं अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी स्कूल बस चालकालाही बेड्या ठोकण्यात आला आहे.

कलम 376 नुसार बलात्काराच्या गु्न्ह्याखाली या स्कूल बस चालकावर आता खटला चालवला जाणार आहे. दरम्यान, पोलिसांनी रविवारीच या आरोपीला कोर्टासमोर हजर केलं होतं. कोर्टानं 25 जुलैपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा

3 वेळा बलात्कार!

स्कूलबस चालकानं मार्च ते जुलै दरम्यान, तीन वेळा या मुलीवर बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहे. या मुलीसोबत मैत्री करत स्कूल बस चालकानं तिच्याशी संबंध वाढवले. त्यानंतर तिचा बलात्कार केला, असा गंभीर आरोप केला गेलाय. रविवारी आरोपी ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला लगेचच कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं.

याप्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे. अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणा मुलीच्या संमतीचा मुद्दा ग्राह्य धरला जात नाही. एका दहावीत शिकणाऱ्या मुलीवर स्कूल बस ड्रायव्हरने हा बलात्कार केलाय. ही मुलगी स्कूल बसनेच ये-जा करत होता. स्कूल बस चालकाने आपल्या जाळ्यात या मुलीला ओढलं. तिच्या चांगले संबंध बनवले आणि तिला शरीरसुखासाठी भाग पाडलं, असंही ते म्हणालेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनीच्या मैत्रिणीच्या घरात त्यांनी एकमेकांशी संबंध ठेवले होते. मार्च आणि जुनमध्ये संबंध ठेवल्यानंतर एका निर्माणाधीन बांधकामाच्या ठिकाणी 16 जुलैलाही त्यांनी संबंध ठेवल्याचं समोर आलंय. पीडित मुलीच्या आईने मुलीची चौकशी केल्यानंतर हे धक्कादायक वास्तव समोर आलं. यानंतर तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेत स्कूल बस ड्रायव्हरला ताब्यात घेतलंय. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.

Non Stop LIVE Update
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.